पुणे : राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा दुसऱ्या आठवड्याचा पहिला दिवसही वादळी ठरला. यावेळी विरोधकांनी भुखंड, सिल्लोड कृषी महोत्सव, सीमावाद यावरून विधान भवनाच्या पायऱ्यावर जोरदार घोषणाबाजी दिली. तर दुसऱ्या बाजूला सत्ताधारी आमदारांनी देखील राहुल शेवाळे प्रकरणावरून घोषणाबाजी दिली. यावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी एक खोचक ट्विट केलं आहे.
“नारायण राणेंचं कर्तृत्व शुन्य, त्यांना कवडीचीही किमंत कुणी देत नाही”
विधानभवनाच्या पायऱ्यावरच आज सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले होते. यावरून रोहित पवार यांनी म्हटलं आहे की, सोशल मीडियातला हा व्हिडीओ बघून सत्ताधाऱ्यांचं आंदोलन आठवलं. रस्त्यावरची ही कमान कुठं होती आणि कुठं लागली हे जसं कळत नाही तसं सत्ताधाऱ्यांचं झालं आहे.
बाळासाहेब थोरातांना भोवळ, हाताला, खांद्याला दुखापत, मुंबईत आणणार..
ज्यांनी निर्णय घ्यायचे, लोकांची कामं करायची पण ते राहिलं बाजूला आणि हे फलक हातात घेऊन आंदोलन करतायेत. कशालाच कशाचा मेळ नाही. असं म्हणत रोहित पवारांनी डिवचलं आहे.
सोशल मिडियातला हा व्हिडिओ बघून सत्ताधाऱ्यांचं आंदोलन आठवलं.. रस्त्यावरची ही कमान कुठं होती आणि कुठं लागली हे जसं कळत नाही तसं सत्ताधाऱ्यांचं झालंय..
ज्यांनी निर्णय घ्यायचे.. लोकांची कामं करायची… पण ते राहिलं बाजूला आणि हे फलक हातात घेऊन आंदोलन करतायेत… कशालाच कशाचा मेळ नाही.. pic.twitter.com/ZoR5ryBOOg— Rohit Pawar (@RRPSpeaks) December 26, 2022
Read also
- “तर कृषीमंत्र्याला सभागृहात बसण्याचा अधिकार नाही, फौजदारी गुन्हा दाखल करा”
- सोमय्यांकडून शरद पवारांचं कौतुक, म्हणाले, “मी त्यांच्याकडून एक गुण घेतलाय, तुम्हीही घ्या”
- “खंड न पडता खाता श्रीखंड, सांगा एकनाथराव…यासाठीच केला होता का बंड”; राष्ट्रवादीने डिवचलं
- “भाजपचं शिंदे गटाला संपवण्याचा प्रयत्न,एकनाथ भाऊंना कधी समजणार?” सुषमा अंधारे
- “आदित्य ठाकरे सोन्यासारखा मूलगा, त्यांना बदनाम करणाचे विरोधकांचे प्रयत्न”