पुणे : भाजपचे खासदार गिरीश बापट गेल्या अनेक दिवसापासून आजारी आहेत. त्यामुळे त्यांच्यावर पुण्यातील एका रूग्णालयात उपचार सुरू आहे. अलिकडेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील गिरीश बापट यांच्या तब्येतीची रूग्णालयात जाऊन चौकशी केली. यातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील रूग्णालयात जाऊन चौकशी केली. यावेळी त्याठिकाणी भाजपचे नेते किरीट सोमय्या देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी शरद पवारांना वाकून नमस्कार केला.
“महाराष्ट्रातील सर्वात मोठा गद्दार, अब्दुल सत्तार, अब्दुल सत्तार…” अन् परिसर दणाणला
शरद पवार यांच्या भेटीवर किरीट सोमय्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, मी आणि शरद पवार यांनी गिरीश बापट यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपुस केली. शरद पवार ज्याप्रकारे गिरीश बापट यांच्या तब्येतीची आपुलकीने चौकशी करत होते, ते पाहून बरं वाटलं. असं सोमय्या म्हणाले.
संजय राऊतांनी ट्विट केला सुतळी बॉम्बचा फोटो, विरोधक धाकधुकीत
तसेच महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवारांचं वेगळ स्थान आहे. सर्वच राजकारण्यांनी पवार यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. आम्ही नेहमीच त्यांचा आदर करतो. असंही सोमय्या म्हणाले. ज्यावेळी गिरीश बापट यांना भेटण्यासाठी रूग्णालयात गेलो, तेव्हा कळलं की,शरद पवार देखील येत आहे. त्यामुळे मी थांबून घेतलं अन् शरद पवारांचीही भेट झाल्याचं सोमय्या म्हणाले.
“अजित पवारांनी अब्दुल सत्तारांना घेतलं धारेवर, थेट राजीनाम्याची मागणी”
दरम्यान, शरद पवार यांच्याकडून सगळ्या राजकारण्यांनी एक घेण्यासारखा एक गुण मी घेतला आहे. पवार साहेब यांनी बापट साहेबांबद्दल खुप विचारपुस केली. आम्ही आत गेलो, बापट पेरू खात होते आणि लगचे शरद पवार यांनी पेरूवर चर्चा केली. त्यावर गिरीश बापट यांना शरद पवार म्हणाले की, लवकर संसदेत या, असंही ते म्हणाले.
Read also
- “खंड न पडता खाता श्रीखंड, सांगा एकनाथराव…यासाठीच केला होता का बंड”; राष्ट्रवादीने डिवचलं
- “भाजपचं शिंदे गटाला संपवण्याचा प्रयत्न,एकनाथ भाऊंना कधी समजणार?” सुषमा अंधारे
- “आदित्य ठाकरे सोन्यासारखा मूलगा, त्यांना बदनाम करणाचे विरोधकांचे प्रयत्न”
- “नारायण राणेंचं कर्तृत्व शुन्य, त्यांना कवडीचीही किमंत कुणी देत नाही”
- बाळासाहेब थोरातांना भोवळ, हाताला, खांद्याला दुखापत, मुंबईत आणणार..