नागपूर : राज्याच्या विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशनाचा आता दुसरा आठवडा सुरू आहे. अधिवेशनाचं कामकाज सुरू होण्याच्या अगोदर विरोधक पायऱ्यांवर राहून सत्ताधारी नेत्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत आहेत. आज अब्दुल सत्तार आणि भुंखड प्रकराणावरून महाविकास आघाडीच्या आमदारांनी भजनी आंदोलन करत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी दिली.
“तसं सत्ताधाऱ्यांचं झालंय”, अन् रोहित पवारांनी तो व्हिडिओ ट्विट करत साधला निशाणा
गायरान जमीनी, आणि सिल्लोड कृषी महोत्सव भ्रष्टाचार आणि भुखंड प्रकरणावरून विरोधकांनी जोरदार आंदोलन केलं. यावेळी हातात टाळ घेत मंत्री सत्तार आणि संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांनी आंदोलन केलं. यावेळी गुवाहाटीला चला तुम्ही, सुरतेला चला. खोक्यांनी लुटा, कधी खोऱ्याने लुटा, खोके घ्यायला चला तुम्ही..खोके घ्यायला चला. अशा घोषणा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिल्या.
“तर कृषीमंत्र्याला सभागृहात बसण्याचा अधिकार नाही, फौजदारी गुन्हा दाखल करा”
महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार भजनी आंदोलन करून सरकारची कानउघडणी केली. आता हा महाराष्ट्राच्या मातीतला आवाज महाराष्ट्राच्या जनतेला न्याय मिळवून देणार असं शिवसेनेने ट्विट केलं आहे. भुखंड घ्या, कुणी श्रीखंड घ्या, असं म्हणत काल राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी दिली.
प्रत्येक दिवशी ह्या घटनाबाह्य सरकारच्या गद्दार गटातल्या मंत्र्यांचे घोटाळे आणि गैरव्यवहार लोकांसमोर येत आहेत. ह्यांच्या हकालपट्टीसाठी आज मविआ च्या आमदारांनी जोरदार भजनी आंदोलन केले. pic.twitter.com/mDqJADh07S
— Aaditya Thackeray (@AUThackeray) December 27, 2022
Read also
- “नाममात्र विरोध करणारा सच्चा विरोधी पक्ष नेता अजित दादांच्या रूपात पहिल्यांदाच महाराष्ट्राने पाहिला”
- अन्यथा पुणे महापालिका जिंकणे भाजपला अवघड जाईल..! भाजप नेत्यांचं सुचक विधान
- रूपाली पाटील आमदार होण्याच्या वाटेवर, कसबा मतदार संघातून पोटनिवडणुक लढवणार?
- विधानभवनावर ‘आप’चा धडक महामोर्चा, विविध मागण्यांसाठी दिले निवेदन
- “तरूणाला शिव्या देत जबरदस्त मारहाण, शिंदे सरकारमधील आणखी एक मंत्री अडचणीत”