पुणे : आगामी महापालिका , विधानसभा, लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन भाजप मोठे बदल करण्याची शक्यता आहे. यातच पुणे शहारातील भाजपचं अंतर्गत राजकारण अनेकदा चर्चेत ठरलं आहे. यातच भविष्यात महापालिका निवडणुक डोळ्यासमोर ठेऊन शहाराध्यक्ष बदलला नाही तर महापालिका निवडणुक जिंकणे अवघड जाईल.त्यामुळे नेतृत्वात बदल करावा, अशी मागणी माजी नगरसेवक आणि भाजपचे नेते उज्ज्वलल केसकर यांनी सांगितले आहे.
सोमय्यांकडून शरद पवारांचं कौतुक, म्हणाले, “मी त्यांच्याकडून एक गुण घेतलाय, तुम्हीही घ्या”
पुणे भाजपच्या नेतृत्वात बदल करणे आता गरजेचे आहे. आमदार सिद्धार्थ शिरोळ अथवा प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांना अध्यक्ष करा. तसेच जगदीश मुळीक यांना खासदारकी द्या आणि पुनर्वसन करा, पण शहाराध्यक्ष पद त्वरीत बदलले पाहिजे, सिद्धार्थ शिरोळे हा योग्य उमेदवार आहे. त्यामुळे शहाराध्यक्ष जगदीश मुळीक यांना पदावरून हटवावे, अशी मागणीही उज्ज्वल केसकर यांनी केली आहे.
“खंड न पडता खाता श्रीखंड, सांगा एकनाथराव…यासाठीच केला होता का बंड”; राष्ट्रवादीने डिवचलं
कोल्हापुर येथील चंद्रकांत पाटील यांना पुण्यातील कोथरूड मतदार संघातून विधानसभेसाठी तिकीट देण्यात आल्यानंतर भाजपनेते गटबाजी दिसून आली. त्यानंतर भाजपचे खासदार गिरीश बापट आपोपच बाजूला पडले अन्, पालकमंत्रीपदही चंद्रकांत पाटलांना देण्यात आले. यानंतर पुण्यात बापट अन् चंद्रकांत पाटील असे दोन गट बघायला मिळाले.
Read also
- रूपाली पाटील आमदार होण्याच्या वाटेवर, कसबा मतदार संघातून पोटनिवडणुक लढवणार?
- विधानभवनावर ‘आप’चा धडक महामोर्चा, विविध मागण्यांसाठी दिले निवेदन
- “तरूणाला शिव्या देत जबरदस्त मारहाण, शिंदे सरकारमधील आणखी एक मंत्री अडचणीत”
- “तसं सत्ताधाऱ्यांचं झालंय”, अन् रोहित पवारांनी तो व्हिडिओ ट्विट करत साधला निशाणा
- “तर कृषीमंत्र्याला सभागृहात बसण्याचा अधिकार नाही, फौजदारी गुन्हा दाखल करा”