मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. सत्ताधारी आणि विरोधक पहिल्याच दिवशी आमने-सामने आले आहेत. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन पहिल्याच दिवशी विधानसभेत अभूतपूर्व गोंधळ झाला आहे. यावेळी सत्ताधारी आणि विरोधक आपापसात भिडले. विधानसभा अध्यक्षांच्या दालनात विरोधकांकडून हा धक्काबुक्कीचा प्रकार झाल्याचा आरोप सत्ताधारी पक्षाने केला असून, परिणामी भाजपच्या १२ आमदारांवर १ वर्षाची निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. दुसरीकडे विरोधकांनी मात्र, या आरोपाचं खंडण केलं आहे.
भाजपचे १२ आमदार निलंबित करण्यासाठी ठाकरे सरकारचा पुर्वनियोजित कट
दरम्यान, या घटनेनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, आमदारांवर अशी कारवाई करू नका, अशी विनंती केली. मात्र, त्यानंतरही ही कारवाई करण्यात आल्याने, भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. यानंतर भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले असून, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या चेंबरमध्ये भाजप नेत्यांची बैठक सुरु होती. या बैठकीत, १२ आमदारांवर झालेल्या कारवाईवर, हे सर्वच्या सर्व निलंबित आमदार आज संध्याकाळी 6 वाजता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन, त्यांच्यासमोर वस्तुस्थिती मांडणार आहेत आणि त्यांच्याकडे दाद मागणार आहेत.
काय घडलं सभागृहात?
ओबीसी आरक्षणाच्या ठरावावर चर्चा सुरू असताना, भाजपच्या आमदारांनी सभागृहात गोंधळ घालायला सुरुवात केली. यावेळी काही आक्रमक आमदारांनी, पुढे हौदात येऊन जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घातला. एका आमदाराने तालिका अध्यक्षांचा माईक ओढला. तर काहींनी थेट अध्यक्षांनाच शिवीगाळ केली, असा सत्ताधाऱ्यांचा आरोप आहे. या गदारोळात धक्काबुक्की देखील झाली असल्याचा अआरोप विरोधकांवर करण्यात आला असून, परिणामी या 12 आमदारांचं निलंबन करण्यात आलं आहे.
ओबीसी आरक्षणासाठी केंद्राने इम्पेरिकल डेटा द्यावा, ठाकरे सरकारकडून विधानसभेत ठराव मंजूर
आता याचे पडसाद आता उर्वरित अधिवेशनाच्या सत्रांमध्ये आणि उद्याच्या दिवशी काय होणार, याकडे देखील सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे. या कारवाईवर सर्व भाजप नेत्यांनी कडाडून विरोध केला असून, भाजप नेत्यांनी या कारवाईची तुलना तालिबान आणि मुघलाईशी करत, या निर्णयाचा धिक्कार केला आहे.
निलंबित केलेले १२ आमदार…
संजय कुटे
आशिष शेलार
अभिमन्यू पवार
गिरीष महाजन
पराग अळवणी
राम सातपुते
हरिश पिंगळे
भातखळकर
जयकुमार रावल
नारायण कुचे
बंटी भांगडिया
योगेश सागर
Read Also :
- ओबीसी आरक्षणासाठी केंद्राने इम्पेरिकल डेटा द्यावा, ठाकरे सरकारकडून विधानसभेत ठराव मंजूर
- विधानसभेचं वातावरण तापलं, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सभागृहात विरोधकांचा जोरदार गोंधळ
- सत्ताधारी विरोधकांमध्ये धक्काबुक्की; भाजपच्या तब्बल १२ आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन
- “ओबीसींच्या इम्पिरीकल डेटाचा ठराव, म्हणजे ठाकरे सरकारचं वेळकाढूपणाचं धोरण”- देवेंद्र फडणवीस
- केंद्र सरकार एम्पिरिकल डाटा देत नाही; विधानसभेत ठरावावरून फडणवीस-भुजबळ आमने-सामने