मुंबई : महाड इथे पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत आक्षेपार्ह वक्तव्य केलं आणि त्यावरून काल दिवसभर राज्यभरात विविध ठिकाणी शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांच्यात जोरदार राडा झालेला पाहायला मिळाला. यानंतर राणे संगमेश्वर इथे असताना त्यांना स्थानिक पोलिसांकडून अटक करण्यात आली आणि त्यांना महाड पोलिसांकडे सुपुर्द करण्यात आलं. त्यानंतर रात्री उशिरा महाड न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.
राणे माणसाची औलाद नाही, तुझा कोथळा बाहेर नाही काढला तर नाव सांगणार नाही – शिवसेना आमदार
दरम्यान, आता राणेंवरची हि कारवाई सूडाच्या हेतूने आणि राजकीय प्रेरणेने केली गेली असल्याचा आरोप भाजपने केला असून, राणेंच्या ‘त्या’ वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या ‘दसरा मेळावा’मध्ये, उ.प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल केलेल्या याच आशयाच्या वक्तव्याचा संदर्भ देत, मुख्यमंत्र्यांवर भाजपकडून पाच ठिकाणी तक्रार दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती भाजप यवतमाळ जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांनी दिली.
परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घरावर हल्ला; पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे प्रक्रिया सुरू
“शिवरायांना राज्याभिषेक करताना उ. प्रदेशमधून इथे गागाभट्ट आले होते. त्यांनी किती सन्मानाने शिवरायाला राज्याभिषेक केला. आणि हा योगी आला. कसलं काय, गॅसचा फुगा असतो ना, काही नसतं गॅस असतो, पण हवेत उडत असतो, तसा हा गॅसचा फुगा आहे. आला तो सरळ चपला घालून महाराजांना हार घालायला गेला.. सरळ चपला घालून.. असं वाटलं त्याच चपला घ्याव्या आणि त्याचं थोबाड फोडावं… लायकी तरी आहे का तुझी महाराजांच्या पुतळ्यासमोर राहण्याची..” असे शब्द मुख्यमंत्र्यांनी यात वापरले आहेत.
दु. ४ वाजता राणेंची पत्रकार परिषद, नवे गौप्यस्फोट करणार असल्याची चर्चा
त्यामुळे, आता भाजपकडूनही शिवेसेनेला घेरण्यासाठी आणि जशास तसे उत्तर देण्यासाठी तयारी केली जास्त असल्याचे यातून दिसून येत आहे. दरम्यान, भाजप-शिवसेनेमधला संघर्ष हा अजून चिघळला असून, गेल्या काही दिवसांपासून झालेल्या घटनाक्रमामुळे आता भाजप-शिवसेना युतीच्या शक्यता पूर्णपणे मावळण्यात जमा आहेत. दुसरीकडे आज ४ वाजता नारायण राणे पत्रकार परिषद घेणार असून, यात ते काय बोलणार याकडे राज्याचे लक्ष लागून आहे.
Read Also :
- आसमान में थुंकने वालों, करारा जवाब मिलेगा; नितेश राणेंचा शिवसेनेला इशारा
- फुग्याला भोक तुमच्या पडलं, आमच्या नाही; चंद्रकांत पाटीलांचा शिवसेनेवर घणाघात
- फडणवीसांना कायद्याचं चांगलं ज्ञान, पण मी माझ्या आदेशावर ठाम; नाशिक पोलिसांकडून राणेंना नोटीस
- राणे प्रकरणावर शरद पवारांनी केली, मोजक्या शब्दांत उपरोधिक टीका
- केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या वक्तव्यावर, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया…