मुंबई : ‘तौक्ते’ चक्रीवादळाचा महाराष्ट्र आणि गुजरात किनारपट्टीवर फार मोठा फटका बसल्याचं दिसलं. मुंबई आणि कोकण किनारपट्टी भागातील मोठे नुकसान झाले. राज्य सरकारने आता नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहे. आता वादळ ओसरल्यानंतर राजकीय नेत्यांच्या दौऱ्यासोबतच, आरोप-प्रत्यारोप देखील सुरू झाले आहे.
तौक्ते चक्रीवादळाचा जोर ओसरल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर हे कोकणात दाखल झाले. भाजप नेत्यांनी नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील गुजरातची पाहणी करत मदतनिधी जाहीर केला आहे. मात्र, आता यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जोरदार टोला लगावला आहे.
वादळ #तौक्ते ने झालेलं नुकसान त्यासाठीची मदत व सर्वात महत्वाचे लोकांना आधार देण्यासाठी पंतप्रधान गुजरातेत तर विरोधीपक्षनेता @Dev_Fadnavis ji कोकणात पोहोचलेत@CMOMaharashtra ji तुम्ही आमचे कुटुंबप्रमुख आहात किमान मुंबईत तर दौरा करा
त्रस्तजनता मातोश्रीबाहेर आंदोलन करते आता तरी निघा— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) May 19, 2021
मोदी गुजरात दौऱ्यावर तर फडणवीस कोकण दौऱ्यावर, मुख्यमंत्री साहेब तुम्ही मुंबईचा तरी करा, असा जोरदार टोला चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.
चित्रा वाघ म्हणाल्या की, वादळ तौक्तेने झालेलं नुकसान त्यासाठीची मदत व सर्वात महत्वाचे लोकांना आधार देण्यासाठी पंतप्रधान गुजरातेत तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कोकणात पोहोचलेत. मुख्यमंत्रीजी तुम्ही आमचे कुटुंबप्रमुख आहात किमान मुंबईत तर दौरा करा. त्रस्तजनता मातोश्रीबाहेर आंदोलन करते आता तरी निघा, असा सणसणीत टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.
Read Also :
- ‘गतवर्षी आलेल्या निसर्ग वादळाची आधी “तातडीने” भरपाई द्या’
- ‘शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्या अन्यथा…’, काँग्रेसचा मोदी सरकारला इशारा
- ‘ठाकरे सरकार पाण्यात डुंबत बसलेल्या म्हशीसारखं, ढुसणी दिल्याशिवाय हलत नाही’
- “पोटात आहे तेच ओठात येतं”, मोदीजी म्हणाले करोना केसेस वाढवा!
- केंद्राकडून लस निर्मिती वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची मला कल्पना नव्हती.