मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी सुप्रिया सुळे यांच्याबाबत वक्तव्य करताना त्यांना मसणात जा असं सांगितलं होतं. त्यांच्यावर कडाडून टिका करण्यात आली. त्याचाच धागा पकडत सामनामधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील मसणात जा, अशी भाषा वापऱण्यात आली. त्यावरून राज्याचे विरोधी पक्षनेते यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टिका केली आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे.
“चंद्रकांत पाटील हे शिवाजी महाराजांचे वंशज आहेत का”? संजय राऊत भडकले
नागपुर येथे पत्रकारांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कुणी मुख्यमंत्र्यांविरुद्ध, सत्तारुढ नेत्यांविरुद्ध बोलले तर 5-10 ठिकाणी तक्रारी होऊन त्याला जेलमध्ये जावे लागते आणि देशाच्या पंतप्रधानांविरुद्ध कुणी बोलले तर त्याचा सन्मान होतो, ही आता महाराष्ट्राची परंपरा होत चालली आहे. अशी खोचक टिप्पणी देखील त्यांनी यावेळी केली आहे. तसेच भाजप नेते किरीट सोमय्यांनी देखील काल मुख्यमंत्र्यांचा उल्लेख लुच्छा म्हणून केला होता. त्यावर देखील शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची नोकरी जाणार? केंद्र सरकारकडून हालचाली सुरू
उद्धव साहेब ठाकरे यांच्यावर आरोप करताना नालायक हारामखोर किरीट सोमय्या यांनी भान ठेवावे. अन्यथा शिवसैनिक थोबाड फोडतील. उद्धव साहेब ठाकरे यांच्यावरील टीका शिवसैनिक सहन करणार नाही. तसेच शिवसैनिक रस्तावर उतरून भाजपला उत्तर देतील,’ असा सज्जड इशारा शिवसेनेचे नवीन पनवेल उपविभाग प्रमुख प्रशांत जाधव यांनी दिला आहे. भाजपची अवस्था ना घर का ना घाट का अशी झाली आहे. सत्तेविना भाजपची मंडळी तडफडत आहेत. शिवसेनप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे बोट धरुन भाजपचे महाराष्ट्रात राजकारण सुरू झाले होते याचे त्यांनी स्मरण ठेवावे. प्रबोधनकार ठाकरे व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांना समाजकारण, राजकारणाचे बाळकडू मिळाले आहेत.
“प्रत्येक आमदारकीची निवडणुक आली की माझ्या नावाची चर्चा होते”; पंकजा मुंडे
दरम्यान मुख्यमंत्री ठाकरे व राज्यातील महाविकास आघाडी सरकार चांगले काम करत आहे. दरम्यान सत्तेवर असताना भाजपच्या नेत्यांनी काय कर्तृत्व दाखविले हे राज्यातील जनता चांगलीच ओळखून आहे. किरीट सोमय्या हा राज्यातील अत्यंत खोटारडा हरामखोर म्हणून ओळखला जातो. असा घणाघात प्रशांत जाधव यांनी केला.
Read also:
- “हे दोन पैशाचे पोस्टर अन् आमचं तीन लाखाचं पोस्टर”; एकाच मंदिरात राष्ट्रवादी आणि नवनीत राणा
- “उद्धव ठाकरेंबाबत बोलताना भान ठेवा नाहीतर शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ”; सेनेचा सोमय्यांना इशारा
- “सोमय्यांना ‘अनैतिक’, ‘आक्रस्ताळे’, ‘अजागळ’ सारखे ‘अ’ कारातील विशेषणे लागू पडतात”
- “यावर शेंबडं पोर तरी विश्वास ठेवेल”? राऊतांच्या प्रश्नावर चंद्रकांत पाटलांचं जोरदार प्रत्युत्तर
- “८ वर्षात मी माझं डोकं कुणापुढं झुकू दिलं नाही”; पंतप्रधान नरेंद्र मोदी