मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अगदी खालच्या पातळीवर टिका केली. त्यानंतर किरीट सोमय्यांवर महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी कठोर शब्दात टिकास्त्र सोडलं. अशातच आता उद्धव ठाकरे यांच्याबद्दल भान ठेवा नाहीतर शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ असा सज्जड दम शिवसेनेचे नवीन पनवेल उपविभाग प्रमुख प्रशांत जाधव यांनी दिला आहे.
“प्रत्येक आमदारकीची निवडणुक आली की माझ्या नावाची चर्चा होते”; पंकजा मुंडे
उद्धव साहेब ठाकरे यांच्यावर आरोप करताना नालायक हारामखोर किरीट सोमय्या यांनी भान ठेवावे. अन्यथा शिवसैनिक थोबाड फोडतील. उद्धव साहेब ठाकरे यांच्यावरील टीका शिवसैनिक सहन करणार नाही. तसेच शिवसैनिक रस्तावर उतरून भाजपला उत्तर देतील,’ असा सज्जड इशारा शिवसेनेचे नवीन पनवेल उपविभाग प्रमुख प्रशांत जाधव यांनी दिला आहे.
पार्थ पवारांना राज्यसभेची उमेदवारी देऊन राष्ट्रवादी मवाळमध्ये ताकद वाढवणार का?
भाजपची अवस्था ना घर का ना घाट का अशी झाली आहे. सत्तेविना भाजपची मंडळी तडफडत आहेत. शिवसेनप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे बोट धरुन भाजपचे महाराष्ट्रात राजकारण सुरू झाले होते याचे त्यांनी स्मरण ठेवावे. प्रबोधनकार ठाकरे व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांना समाजकारण, राजकारणाचे बाळकडू मिळाले आहेत.
दहशतवाद्यांना पैसे पुरवल्या प्रकरणी यासीन मलिकला जन्मठेपची शिक्षा
मुख्यमंत्री ठाकरे व राज्यातील महाविकास आघाडी सरकार चांगले काम करत आहे. दरम्यान सत्तेवर असताना भाजपच्या नेत्यांनी काय कर्तृत्व दाखविले हे राज्यातील जनता चांगलीच ओळखून आहे. किरीट सोमय्या हा राज्यातील अत्यंत खोटारडा हरामखोर म्हणून ओळखला जातो. असा घणाघात प्रशांत जाधव यांनी केला.
Read also:
- “सोमय्यांना ‘अनैतिक’, ‘आक्रस्ताळे’, ‘अजागळ’ सारखे ‘अ’ कारातील विशेषणे लागू पडतात”
- “यावर शेंबडं पोर तरी विश्वास ठेवेल”? राऊतांच्या प्रश्नावर चंद्रकांत पाटलांचं जोरदार प्रत्युत्तर
- “८ वर्षात मी माझं डोकं कुणापुढं झुकू दिलं नाही”; पंतप्रधान नरेंद्र मोदी
- “चंद्रकांत पाटील हे शिवाजी महाराजांचे वंशज आहेत का”? संजय राऊत भडकले
- एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची नोकरी जाणार? केंद्र सरकारकडून हालचाली सुरू