कोेल्हापुर : संभाजी राजे यांनी मुख्यमंत्र्यांवर उपस्थित केलेले प्रश्न हे चुकीचे आहेत. शिवसेना दिलेला शब्द कधी मोडत नाही. तसेच राजकारणात करिअर करायचं असले तर पक्षात असणं महत्वाचं आहे. असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज कोल्हापुरात संभाजी राजे यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. त्याचबरोबर त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा देखील खुरसुम समाचार घेतला. त्यावर आता चंद्रकांत पाटलांनी संजय राऊतांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
दहशतवाद्यांना पैसे पुरवल्या प्रकरणी यासीन मलिकला जन्मठेपची शिक्षा
मी शिवाजी महाराजांचा वंशज नाही, हे सामान्यज्ञान आहे. पण हिंदुत्वविरोध्यांसोबत चाललेल्यांना शिवरायांची मक्तेदारी कुणी दिली? तुम्ही शब्दांचे पक्के आणि बाकीचे सगळेच खोटारडे, यावर शेंबडं पोर तरी विश्वास ठेवेल? आणि हो… सगळीकडे ढवळाढवळ करण्याचा अधिकार विश्वप्रवक्त्यांना कुणी दिला? अस म्हणत त्यांनी राऊतांना खोचक सवाल देखील विचारला आहे.
“मध्यप्रदेशला न्याय मिळाला पण महाराष्ट्राची पुन्हा फसवणूक झाली”; सुप्रिया सुळे
छत्रपती शिवाजी महाराज हे कुणाच्या मालकिचे नाहीत. ते संपुर्ण देशाचे आणि विश्वाचे आहेत. विरोधाला विरोध कऱणे ही भाजपची कायमची सवय आहे. महाविकास आघाडीने एखादा निर्णय घेतली की त्यांनी टिका केली पाहिजे असं त्यांनी ठरवून घेतलं आहे. संभाजी राजे यांच्याबद्दल आम्हाला प्रेम आणि आदर आहे. त्यामुळे इतरांना यामध्ये चोमडेपणा करू नये. तसेच चंद्रकांत पाटील हे शिवाजी महाराजांचे वंशज आहेत का? असा खोचक सवाल देखील संजय राऊतांनी उपस्थित केला.
मग अडीच वर्ष अजित पवार मंत्रालय झाडत बसले होते का? पडळकरांचा पवारांना खोचक सवाल
दरम्यान, कोल्हापुरात कार्यकर्त्यांची संघटनात्मक बांधणी करण्यासाठी आलो आहे. आगामी होऊ घातलेल्या 2024 च्या निवडणुकीसाठी आपला प्रत्येक कार्यकर्ता तयार असला पाहिजे. त्यासाठी शिवसंपर्क मोहिस सुरू केले आहे. आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तींनी मुख्यमंत्र्यांबद्दल चांगली भावना ठेवली पाहिजे,असं काम केलं पाहिजे, अशा सुचना देखील राऊतांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना दिली.
Read also:
- “८ वर्षात मी माझं डोकं कुणापुढं झुकू दिलं नाही”; पंतप्रधान नरेंद्र मोदी
- “चंद्रकांत पाटील हे शिवाजी महाराजांचे वंशज आहेत का”? संजय राऊत भडकले
- एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची नोकरी जाणार? केंद्र सरकारकडून हालचाली सुरू
- “प्रत्येक आमदारकीची निवडणुक आली की माझ्या नावाची चर्चा होते”; पंकजा मुंडे
- पार्थ पवारांना राज्यसभेची उमेदवारी देऊन राष्ट्रवादी मवाळमध्ये ताकद वाढवणार का?