मुंबई : आगामी काही दिवसात विधान परिषदमधील 10 सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर त्या साठी निवडणुक प्रक्रिया देखील जाहीर करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी येत्या 20 जुन रोजी मतदान होत असून भाजपला 4 तर महाविकास आघाडी सरकारला 6 जागा मिळणार आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपकडून कोणाला उमेदवारी दिली जाईल, याची चर्चा सध्या रंगली आहे.
“मनात काहीच किंतु-परंतु नाही, परंतु मी भाजपच्या दोन नेत्यांची शिकार करणार”
भाजपकडून विधान परिषदेचे नेते प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. तर शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे, तसेच एका महिला सदस्याला संधी मिळण्याची शक्यता आहे. यात पंकजा मुंडे, भाजप उपप्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, मेधा कुलकर्णी यांची नावे आघाडीवर आहे. त्यामुळे यामधून नेमकी कुणाला संधी भाजप देणार ते आता पहाणं महत्वाचं ठरणार आहे.
गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता होती, तेव्हा त्यांनी काय केले ? धनंजय मुंडेंचा भाजपला सवाल
प्रत्येक आमदारकीची निवडणुक आली की, भाजपकडून पंकजा मुंडे यांच्या नावाची चर्चा केली जाते. विधान परिषदबाबत पंकजा मुंडे यांना विचारण्यात आल्यानंतर त्या म्हणाल्या की, याबाबत मला पक्षांकडून अजूनही काही सांगण्यात आले नाहीत. मात्र प्रत्येक निवडणुक आली की माझ्या नावाची चर्चा होते. त्यामध्ये अनेकांची नावे समोर येत आहे. त्यामुळे पक्ष काय निर्णय घेईल, तो मला मान्य असेल, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
“मातंग समाजाचा आधारवड राज्य सरकारने मुळासकट उपटून टाकला”
दरम्यान, रयत क्रांतीचे नेते सदाभाऊ खोत यांना मागील वेळी भाजपकडून विधान परिषदेवर पाठवण्यात आले होते. मात्र यावेळी भाजपकडून त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच महाविकास आघाडीकडून कोणत्या नेत्याला उमेदवारी देण्यात येईल, त्याची माहिती अद्यापही समोर आली नाही.
Read also:
- पार्थ पवारांना राज्यसभेची उमेदवारी देऊन राष्ट्रवादी मवाळमध्ये ताकद वाढवणार का?
- दहशतवाद्यांना पैसे पुरवल्या प्रकरणी यासीन मलिकला जन्मठेपची शिक्षा
- “मध्यप्रदेशला न्याय मिळाला पण महाराष्ट्राची पुन्हा फसवणूक झाली”; सुप्रिया सुळे
- मग अडीच वर्ष अजित पवार मंत्रालय झाडत बसले होते का? पडळकरांचा पवारांना खोचक सवाल
- राज्य सरकारचा बुरखा मुंबईतल्या आंदोलनानं आज टराटरा फाडला