पुणे : राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी खासदार संभाजी राजे यांच्याविरोधात कोल्हापुरात शिवसेनेने संजय पवार यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे औरंगाबादचे सलग चारवेळा खासदार असलेले चंद्रकांत खैरे आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांना यावरून डावलण्यात आले, अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. तर याबाबत चंद्रकांत खैरेंनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. यावर बोलताना त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
“शरद पवारांकडे लोकांना गुळ दाखवण्याची परंपरा, फडणवीसांनी ओबीसी आरक्षणाचं नेतृत्व करावं”
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जो आदेश दिला तो माझ्यासाठी महत्वाचा आहे. संजय पवार हे सुद्धा जुने आणि कडवट शिवसैनिक आहेत. राजेंसमोर एक मजबुत शिवसैनिकांना संधी दिल्याने आम्हाला याचा अभिमान आहे. त्यामुळेच मी उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन आणि कौतुक करतो. आपल्या नशिबात जे असतं ते होईल. माझ्या मनात काहीच किंतु-परंतु नाही म्हणूनच उद्धव ठाकरे यांचा आदेश आम्हाला मान्य आहे, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत खैरे यांनी दिली आहे.
“पुलवामाचे काय झाले बापाला विचारले का? “सोमय्यांचा ‘चिरीट तोमय्या’ उल्लेख करत दिपाली सय्यदचा सवाल
आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरून त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. त्यांनी भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री अर्थराज्यमंत्री भागवत कराड आणि केंद्रीय मंत्री रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर टिका केली आहे. मी शिवसेनेचा वाघ असून, मी शिकार करू शकतो. अनेकांची शिकार केली आहे. मला दोन बोके दिसतायत त्यांची मी शिकार करणार अशी खोचक टिप्पणी देखील त्यांनी केली आहे.
“मराठा आरक्षणाला बेताल विरोध करणाऱ्या सदावर्तेच्या माध्यमातुन फडणवीसांनी आरक्षण घालवले”
दरम्यान, संभाजी राजे यांना पक्षात आल्यानंतर त्यांना राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात येईल, असं म्हटलं होतं. परंतु संभाजी राजे अपक्ष म्हणूनच निवडणुक लढविण्यावर ठाम राहिले. त्यानंतर शिवसेनेने संजय पवार यांना उमेदवारी देण्यात आली. आता राज्यसभा नव्हे तर संपुर्ण राज्यच घेणार. इतिहासाची पुनरावृत्ती, महाराष्ट्रात स्वराज्यची निर्मिती, लक्ष्य 2024 असं त्या पोस्टवर लिहिलं आहे. तसेच त्या पोस्टरमध्ये संभाजी राजे यांचं देखील चित्र देण्यात आलं आहे.
Read also:
- गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता होती, तेव्हा त्यांनी काय केले ? धनंजय मुंडेंचा भाजपला सवाल
- “मातंग समाजाचा आधारवड राज्य सरकारने मुळासकट उपटून टाकला”
- राज्यसभा नव्हे तर आता संपुर्ण ‘राज्य’ च घेणार; संभाजी राजेंनी निवडणुकीसाठी दंड थोपटले
- काॅंग्रेसची गळती अजूनही सुरूच; कपिल सिब्बल यांची काॅंग्रेसला सोडचिठ्ठी
- मराठा समाजाने आता तरी या कावेबाजांचा डाव ओळखावा; राजू पाटलांचा संभाजी राजेंना पाठिंबा