नवी दिल्ली : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच देशात काॅंग्रेस पक्षाला गळती सुरू झाली आहे. काॅंग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनी काॅंग्रेसला सोडचिठ्ठी देत अनेकांना धक्का दिला आहे. येणाऱ्या काही दिवसात होऊ घातलेल्या राज्यसभेच्या निवडणुकीसाठी कपिल सिब्बल यांना समाजवादी पार्टीकडून उमेदवारी देण्यात येणार असल्याने त्यांनी काॅंग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे.
औरंगाबादमध्ये भाजपचा ‘जल आक्रोश मोर्चा’; देवेंद्र फडणवीस दानवेंचं मोठं शक्तीप्रदर्शन
पंजाबमधील माजी प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांना अलिकडेच एका जुन्या प्रकरणाबाबत एका वर्षाचा कारावास ठोठवला आहे. तर गुजरातमधील तरूण तडपदार काॅंग्रेसचे नेतृत्व करीत असलेले हार्दिक पटेलने देखील काॅंग्रेस नेतृत्वाबाबत प्रश्निचन्ह उपस्थित करत काॅंग्रेसचा राजीनामा दिला. तर पंजाबमधीलदेखील काही नेत्यांनी काॅंग्रेस पक्ष सोडला आहे.
..तर तुला गृहमंत्र्यांच्या दारी उभं करू, अमरावतीची भाकरवडी
मागील काही दिवसांपासून कपिल सिब्बल हे काॅंग्रेसवर नाराज होते. त्यांनी देखील काॅंग्रेस नेतृत्वाबाबत अनेकदा आवाज उठवला. तसेच जयपुर येथे झालेल्या काॅंग्रेस चिंतन शबरीरात देखील ते गैरहजर राहिले होते. कपिल सिब्बल हे काॅंग्रेसच्या G-23 गटाचे प्रमुख नेते होते. मागच्या वर्षी याच गटाने काॅंग्रेस नेतृत्वाबाबात सोनिया गांधी यांना पत्र पाठवले होेते.
Read also:
- मराठा समाजाने आता तरी या कावेबाजांचा डाव ओळखावा; राजू पाटलांचा संभाजी राजेंना पाठिंबा
- “शरद पवारांकडे लोकांना गुळ दाखवण्याची परंपरा, फडणवीसांनी ओबीसी आरक्षणाचं नेतृत्व करावं”
- “पुलवामाचे काय झाले बापाला विचारले का? “सोमय्यांचा ‘चिरीट तोमय्या’ उल्लेख करत दिपाली सय्यदचा सवाल
- “मराठा आरक्षणाला बेताल विरोध करणाऱ्या सदावर्तेच्या माध्यमातुन फडणवीसांनी आरक्षण घालवले”
- राज्यसभा निवडणुकीत माजी खासदार आढळराव पाटील यांना डावलले! संजय राऊत यांनी शब्द पाळला नाही