मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पार्टनरचे कसाबशी संबंध असल्याचा धक्कादायक आरोप भाजप नेते किरीट सोमय्यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात आता हा विषय चर्चेचा ठरला आहे. भाजपनेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा पत्रकार परीषद घेऊन उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. याचाच धागा पकडत आता शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी किरीट सोमय्यांवर अगदी शेलक्या शब्दात टिप्पणी केली आहे.
अमित शहा, फडणवीसांवर गंभीर आरोप, तर शिवसेनेवर टिका; इम्तियाज जलील संतापले
ये चिरीट तोमय्या पुलवामाच्या हल्ल्यातील आरडीएक्स लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान आला कसा? मोदींच्या निवडणुकीसाठी सुरक्षा जवानांचा वापर केला कसा? कसाब पाकिस्तानी होता मग पुलवामाच्या हल्ल्यातील राजकीय कसाब कोण याचे उत्तर विसरला का? पुलवामाचे काय झाले बापाला विचारले का? असा सवाल देखील दिपाली सय्यद यांनी केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार खडाजंगी बघायला मिळण्याची शक्यता आहे.
“सरकारने पेट्रोल डिझेलवरील कर कपात केलीच नाही”; ठाकरे सरकारने लोकांना मुर्ख बनविले; देवेंद्र फडणवीस
उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीयांचा मुंबई हल्ल्यातील आरोपी व दहशतवादी अजमल कसाबसोबत संबंध आहेत. तसेच मुंबई 26/11 हल्ल्यात पोलिस अधिकाऱ्यांनी वापरलेले बुलेटप्रुफ जॅकेट बोगस होते. त्यामुळेच हेमंत करकरे शहिद झालेत. या बुलेटप्रुफ जॅकेटचा विमल अग्रवाल यांच्या कंपनीकडून पुरवठा होत होता. तसेच मुख्यमंत्री ठाकरेंचे मेहुणे पाटणकर यांची विमल अग्रवाल सोबत संबंध आहे. विमल अग्रवाल यांनी बुलेटप्रुफ जॅकटेचा घोटाळा केला. असा आरोप देखील किरीट सोमय्यांनी केला आहे.
कोल्हापुरात भाजपची मोठी खेळी; शिवसेनेच्या विरोधात तगडा उमेदवार शर्यतीत
दरम्यान, राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक हे दाऊदचे पार्टनर आहे तर उद्धव ठाकरे यांचा कसाबशी व्यावसायिक संबंध आहे. नवाब मलिक यांचे संबंध दाऊद गॅगपर्यंत पोहचू शकतात. तर उद्धव ठाकरे यांच्या पार्टनरचे संबंध कसाब पर्यंत आहेत. हेमंत करकरेंना देण्यात आलेले बुलेटप्रुफ जॅकेट हे बोगस होते. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असा आरोपही किरीट सोमय्यांनी केला आहे.
ये चिरीट तोम्मया पुलवामाच्या हल्ल्यातील RDX लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान आला कसा?
मोदींच्या निवडणुकीसाठी सुरक्षा जवानांचा वापर केला कसा? कसाब पाकिस्तानी होता मग पुलवामाच्या हल्ल्यातील राजकिय कसाब कोण याचे उत्तर विसरला का? पुलवामाचे काय झाले बापाला विचारले का? @ShivSena— Deepali Sayed (@deepalisayed) May 24, 2022
Read also:
- “मराठा आरक्षणाला बेताल विरोध करणाऱ्या सदावर्तेच्या माध्यमातुन फडणवीसांनी आरक्षण घालवले”
- राज्यसभा निवडणुकीत माजी खासदार आढळराव पाटील यांना डावलले! संजय राऊत यांनी शब्द पाळला नाही
- औरंगाबादमध्ये भाजपचा ‘जल आक्रोश मोर्चा’; देवेंद्र फडणवीस दानवेंचं मोठं शक्तीप्रदर्शन
- ..तर तुला गृहमंत्र्यांच्या दारी उभं करू, अमरावतीची भाकरवडी
- राज ठाकरेंचं भाषण आघाडीतील प्रत्येक नेत्यांनी गांभीर्याने घेण्याची गरज; भास्करराव जाधव