IMPIMP

अमित शहा, फडणवीसांवर गंभीर आरोप, तर शिवसेनेवर टिका; इम्तियाज जलील संतापले

Imtiaz Jalil's big statement on water issue

औरंगाबाद :  राज्यात सध्या पाण्याच्या प्रश्नांवरील ठिकठिकाणाच्या जिल्हांमध्ये जोरदार आंदोलने सुरू आहेत. औरंगाबाद येथे आज राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज सायंकाळी 4 वाजता जोरदार आंदोलन होणार आहे. औरंगाबाद महापालिकेवर सध्या शिवसेनेची सत्ता असून त्यांना घेरण्यासाठी भाजपने आंदोलनाचा नारा दिला आहे. याचाच धागा पकडत औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी भाजप आणि शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

“पक्षात १२ वाजता या सांगून तुमची काय किंमत ठेवली? लाथ मारा त्या खासदारकीला”; 

शिवसेना मागील 30 वर्षापासून औरंगाबादच्या लोकांना वेडं बनवत आहे. महापालिकेत सत्तेत असणाऱ्यांनी दरवर्षी फक्त पाच-पाच टाक्या जरी बांधल्या असत्या तरी पाणी प्रश्न इतका गंभीर झाला नसता. यांनी फक्त हिंदु-मुस्लिम आणि मंदिर-मशिद एवढ्याच मुद्दयावर राजकारण केलं. पाण्याच्या प्रश्नासाठी मी औरंगाबादच्या जनतेलाही जबाबदार धरतो. कारण जनतेनं कधीही पाण्यासाठी मतदान केलं नाही. शहरातील लोकांनी फक्त हिंदुत्वासाठी मतदान केलं. पाण्यासाठी मतदान केलं असतं तर आज ही वेळ आली नसती. असं जलील म्हणाले.

संभाजीनगरचं नामंतर झालं, असं बोलणारा तु कोण? राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल 

महापालिकेत विरोधी पक्ष म्हणून एमआयएमने खासगी कंपनीला पाण्याचा ठेका द्यायला जोरदार विरोध केला होता. एखादी खासगी कंपनी काही समाजसेवा म्हणून हे काम करणार नव्हती. ती कंपनी शहरात आधी कोट्यवधींची गुंतवणुक करणार आणि नंतर लोकांकडून पैसे वसुल करणार, हे आम्ही सांगत होतो. मात्र ही कंपनी लादण्यासाठी भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांचा दबाव होता. असा आरोप देखील जलील यांनी केला आहे.

काॅंग्रेसला गळती, शिवसेनेला चिंता; नाना पटोले म्हणाले, ज्यांना बलिदानाची पार्श्वभूमी नाही त्यांच्याबद्दल..; 

दरम्यान,  संभाजीनगर तहानलेलंच का? महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या धरणांपैकी एक, जायकवाडी असूनही संभाजीनगरात घरोघरी रोज नळाला पाणी का नाही? सत्ताधाऱ्यांनी इतक्या वर्षांत काय केलं? याचा जाब विचारण्यासाठी आज ४ वा. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील जलआक्रोश मोर्चात सहभागी व्हा, असं आव्हान चंद्रकांत पाटिल यांनी केलं आहे.

Read also:

 

Total
0
Shares
Previous Article
statement-by-leader-of-opposition-devendra-fadnavis-on-the-tax-cut-taken-by-the-state-government

"सरकारने पेट्रोल डिझेलवरील कर कपात केलीच नाही"; ठाकरे सरकारने लोकांना मुर्ख बनविले; देवेंद्र फडणवीस

Next Article
shiv-sena-mla-bhaskarrao-jadhav-said-that-every-leader-in-the-alliance-needs-to-take-raj-thackerays-speech-seriously

राज ठाकरेंचं भाषण आघाडीतील प्रत्येक नेत्यांनी गांभीर्याने घेण्याची गरज; भास्करराव जाधव

Related Posts
Total
0
Share