मुंबई : शिवबंधन बांधण्यासाठी मातोश्रीवर या, असा निरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजी राजे यांना दिला होता. मात्र संभाजी राजे राज्यसभेची निवडणुक अपक्ष म्हणून लढविण्यावर ठाम आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा संभाजी राजे आणि राज्यसभेच्या सहावी जागेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. याचाच धागा पकडत भाजप नेते निलेश राणे यांनी शिवसेनेवर जहरी टिका करत संभाजी राजे यांना सल्ला दिला आहे.
जितेंद्र आव्हांडाचं एक ट्विट; अन् चार जणांवर कारवाईचा बडगा
निलेश राणे म्हणाले की, कोल्हापूरचे छत्रपती संभाजी, आज रात्रभर विचार करा की ज्या पक्षाने मूक मोर्चाला मुका मोर्चा म्हणून खिल्ली उडवली, तुमच्याकडे महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे मागितले, औरंगजेबच्या कबरीला संरक्षण दिले, पक्षात १२ वाजता या सांगून तुमची काय किंमत ठेवली? लाथ मारा त्या खासदारकीला, असा सुचनावजा कडक शब्दात देखील त्यांनी संभाजी राजे यांना सल्ला दिला आहे.
शरद पवारांना औरंगजेब हा सुफी संत वाटतो का? राज ठाकरेंचा तिखट सवाल
राज्यसभेची सहावी जागा ही अपक्ष म्हणून लढणार असल्याचे संभाजी राजे यांनी जाहीर केले. तसेच राज्यातील राजकीय पक्षांतील विधानसभा सदस्यांना पाठिंबा देण्यास देखील त्यांनी आव्हान केले. मात्र शिवसेने सहावी जागा लढणार असल्याचा निर्धार केला. तसेच संभाजी राजेंनी शिवसेनेत प्रवेश केल्यास त्यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात येईल, असं स्पष्ट केले. मात्र संभाजी राजे यांनी शिवसेनेची ऑफर धुडकावून लावल्याची सध्या चर्चा आहे.
मातोश्रीवर हनुमान चालिसा म्हणायला, ती काय मशिद आहे का? राज ठाकरेंनी राणा दाम्पत्याला खडसावलं
दरम्यान, राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुरूवातीला संभाजी राजे यांना पाठिंबा जाहीर केला. मात्र शिवसेनेने मवाळ भूमिका घेतल्याने राष्ट्रवादी भूमिकेत बदल केला. शिवसेना जो कोणी उमेदवार उभा करेल, त्याला राष्ट्रवादीचा पाठिंबा असेल, असं सांगण्यात आलं. तसेच काल मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांची देखील भेट घेऊन संभाजी राजे यांना पाठिंबा देण्याची विनंती केली. त्यामुळे राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी कोणाची वर्णी लागते ? त्याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून आहे.
Read also:
- संभाजीनगरचं नामंतर झालं, असं बोलणारा तु कोण? राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
- काॅंग्रेसला गळती, शिवसेनेला चिंता; नाना पटोले म्हणाले, ज्यांना बलिदानाची पार्श्वभूमी नाही त्यांच्याबद्दल..;
- अजून किती काळ नवाब मलिकांची पाठराखण करणार? राजीनामा घ्या; चंद्रकांत पाटील
- “पवार साहेब तुमचे डायरेक्ट दाऊद सोबत संबंध नाही ना?” नवाब मलिक प्रकरणांवरून निलेश राणेंचा तिखट सवाल
- नवाब मलिकांचा पाय आणखी खोलात; दाऊदच्या लोकांसोबत व्यवहार केल्याचा न्यायालयाचं निरीक्षण