मुंबई : राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते नवाब मलिक यांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे. कारण शुक्रवारी ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्राची विशेष न्यायालय़ाने पडताळणी केली. यामधून धक्कादाखक माहिती समोर येत आहे. न्यायालयाने केलेल्या निरिक्षणात नवाब मलिक यांनी आर्थिक गैरव्यवहारामध्ये सहभागी होत असल्याचं दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर आता भाजपच्या नेत्यांकडून टिप्पणी केली जात आहे.
नवाब मलिकांचा पाय आणखी खोलात; दाऊदच्या लोकांसोबत व्यवहार केल्याचा न्यायालयाचं निरीक्षण
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस अध्यक्ष शरद पवार या दोघांनाही एकच प्रश्न. इडीकडून दखल दोषारोपपत्राच्या सुनावणीत नवाब मलिकांचे दाऊद टोळीशी संबंध असल्याचं निरीक्षण नोंदवलंय. अजून किती काळ नवाब मलिक यांची पाठराखण करणार? पुरे झाली पाठराखण. देशद्रोहाचा आरोप असलेल्यांचा आता तरी राजीनामा घ्या, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे.
हसिना पारकर, सलिम पटेल आणि सरदार खान यांच्यासोबत गुन्हेगारी कट रचून मुनीरा प्लंबर यांच्या नावे असणारी संपत्ती आरोपी नवाब मलिक यांनी डी कंपनीचे सदस्यांकडून बळकावली, असं विशेष न्यायाधीश राहुल एन रोकडे यांनी म्हटलं आहे. तसेच दाऊदची दिवंगत बहिण हसीना पारकरच्या आणि इतर सहकाऱ्यांच्या मदतीने जमीन बळकावल्याने त्यांच्याविरोधात मनी लॉण्ड्रिंगविरोधी कायद्याअंतर्गत कारवाई करता येईल, असंही न्यायालायने म्हटलं आहे. तसेच नवाब मलिक यांचे दाऊदशी संबंध आहेत, यावर कोर्टाने सुद्धा शिक्कामोर्तब केले आहे…तरीही ते मंत्रिमंडळात आहेत…तरीही ब्येस्ट मुख्यमंत्री हिंदुत्ववादी असल्याच्या बाता करतात. असं भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.
दाऊद आणि नवाब मलिक दोघांचे संबंध आहेत हे संबंधित कोर्टाचं निरीक्षण. नवाब मलिक वर केलेले आरोप खरे ठरले, आतातरी बारामतीचे नेते नवाब मलिकचा राजीनामा घेणार?? की अजून पण दाऊदच्या ग्रीन सिग्नल ची वाट बघत आहेत. पवार साहेब तुमचे डायरेक्ट दाऊद सोबत संबंध नाही ना? नवाब मलिक मधला असू शकतो. राजकारणात जेव्हापासून आलो तेव्हापासून चा हा संशय आहे. कारण मुंबई बॉम्ब ब्लास्ट घटनेपासून तुम्ही एक वाढीव बॉम्ब ब्लास्ट जाहीर केला तो नेमका कोणाला वाचवण्यासाठी होता? तेव्हा मीडिया वेगळी होती, तुम्ही वाचलात. असा इशारा आता भाजप नेते निलेश राणे यांनी दिला आहे.
Read also:
- “पवार साहेब तुमचे डायरेक्ट दाऊद सोबत संबंध नाही ना?” नवाब मलिक प्रकरणांवरून निलेश राणेंचा तिखट सवाल
- नवाब मलिकांचा पाय आणखी खोलात; दाऊदच्या लोकांसोबत व्यवहार केल्याचा न्यायालयाचं निरीक्षण
- जितेंद्र आव्हांडाचं एक ट्विट; अन् चार जणांवर कारवाईचा बडगा
- “एका बाजुला मनसे आणि दुसऱ्या बाजुला माफिया सेना”; अयोध्या दौऱ्याबाबत सोमय्यांची पहिली प्रतिक्रिया
- “फडणवीस साहेब लोकांचा गैरफायदा किती घेणार, देशाचे तुकडे करण्याचा मानस आहे का?”