मुंबई : रामजन्मभूमी मंदिरात दर्शनासाठी कोणीही जाऊ शकतं. सगळ्यांना त्याचा अधिकार आणि सुट असून हे दोन्हीही विषय वेगवेगळे आहेत. अशी प्रतिक्रिया भाजपनेते किरीट सोमय्यांनी यांनी दिली आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. राम हा हिंदुस्थानातील देव आहे. रामाच्या चरणी कोणालाही जायला सुट असते, असंही ते म्हणाले. तसेच त्यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.
आता वेळ आली की, पुढील 25 वर्ष..; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या कार्यकर्त्यांना सुचना
एका बाजुला मनसे आणि दुसऱ्या बाजुला माफिया सेना यांचं भांडण सुरू आहे. माफिया सेनेने भगवा उतरवून हिरवा झेंडा हाती घेतलाय. आता रोज उठून माफिया सेनेचे लोक एकमेकांना जय रामजी की, नमस्कार, जय महाराष्ट्रा म्हणत नाही तर आदाब म्हणतात. असं म्हणत त्यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. त्यामुळे यावर आता शिवसेनेकडून कशा पद्धतीची प्रतिक्रिया येणार ते आता पहाणं महत्वाचं ठरणार आहे.
“तूर्तास अयोध्याचा भोंगा स्थगित करून नवीन भोंगा कोणता लावावा यावर विचारविनिमय सुरू”
राज ठाकरे यांचा दौरा रद्द झाला असला तरी माझा दौरा आणि ५ जूनचा कार्यक्रम होणारच आहे. आम्ही त्या दिवशी साधु-संतांच्या उपस्थितीत शरयू स्नान करू. आता राज ठाकरे अयोध्येत येणार नसल्याने आम्ही आणखी उत्साहात कार्यक्रम साजरा करू. आम्ही ५ जूनला योगी आदित्यनाथ यांचा वाढदिवसही जल्लोषात साजरा करणार असल्याचे उत्तर प्रदेशचे भाजपचे खासदार ब्रीजभूषण सिंह यांनी सांगितले आहे.
राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित; ब्रीजभूषण सिंहांची पहिली प्रतिक्रिया
दरम्यान, राज ठाकरे यांचा येत्या 5 जुन रोजी अयोध्या दौरा होता. मात्र काही कारणास्तव त्यांनी हा दौरा स्थगित करत असल्याची माहिती ट्विटवरून दिली. त्याचबरोबर भाजपचे खासदार बृजभुषण सिंह यांनी राज ठाकरे यांना आव्हान दिलं होतं. त्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे. मात्र यावर राज ठाकरे यांच्या पायाला दुखापत झाल्याने दौरा रद्द केला असल्याची प्रतिक्रिया मनसेकडून देण्यात आली आहे.
Read also:
- “फडणवीस साहेब लोकांचा गैरफायदा किती घेणार, देशाचे तुकडे करण्याचा मानस आहे का?”
- “मनोहर पर्रिकरांचं स्वप्न राजनाथ सिंह पुर्ण करणार”; आमदार महेश लांडगेंनी दिलं संरक्षणमंत्र्यांना निवेदन
- मोदी म्हणजे भारत नाही
- “मोदींची धार्मिक विखार अन् हिंसक विचार पेरणारी विचारसरणी”; ब्रिटीश नेत्यानी मांडले आपले मत
- “शरद पवारांनी सोनिया गांधीकडे माझी तक्रार केल्याचं मला आनंद”; नाना पटोले