मनसेचा बहुचर्चित असलेला अयोध्या दौरा तात्पुरता स्थगित करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करत अयोध्या दौरा स्थगित करण्यात येत असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे येत्या ५ जुन रोजी होणारा अयोध्य दौरा आता कधी होणार त्याकडे सगळ्याचं लक्ष लागून आहे. राज यांच्या या निर्णयानंतर त्यांच्या अयोध्या दौऱ्याला कडाडून विरोध करणारे खासदार ब्रीजभूषण सिंह यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
“पुरून उरेन तुम्हाला ‘चित्रा वाघ’ म्हणतात मला”; चित्रा वाघ यांचा राष्ट्रवादीला अप्रत्यक्ष टोला
राज ठाकरे यांचा दौरा रद्द झाला असला तरी माझा दौरा आणि ५ जूनचा कार्यक्रम होणारच आहे. आम्ही त्या दिवशी साधु-संतांच्या उपस्थितीत शरयू स्नान करू. आता राज ठाकरे अयोध्येत येणार नसल्याने आम्ही आणखी उत्साहात कार्यक्रम साजरा करू. आम्ही ५ जूनला योगी आदित्यनाथ यांचा वाढदिवसही जल्लोषात साजरा करणार असल्याचे ब्रीजभूषण सिंह म्हणाले.
“एका रात्रीत हिंदुत्ववादी झाले अन् अयोध्येला निघाले, बृजभूषण लढवय्या माणूस”; संजय राऊत
ब्रीजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंच्या ५ जूनच्या अयोध्या दौऱ्याचा विरोध करण्यासाठी शरयू स्नानाचा कार्यक्रम आयोजित केला होता. तसेच अयोध्येत येण्याअगोदर राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी असे ते म्हणाले होते. त्यामुळे राज ठाकरे अयोध्येत गेल्यास मोठा वाद पेटण्याची शक्यता होती. मात्र, आता राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा स्थगित केल्याने हा वाद तूर्तास टळला आहे.
“प्रयत्न करणे आपल्या हातात आहे”; OBC आरक्षणाबाबत अजित पवारांंनी दिली मोठी माहिती
दरम्यान, उत्तर प्रदेश भाजपचे खासदार बृजभुषण सिंह यांनी राज ठाकरे यांना आव्हान दिलं होतं. जोपर्यंत उत्तर भारतीयांची माफी मागत नाही. तोपर्यंत राज ठाकरे यांना अयोध्यामध्ये पाय ठेऊ देणार नाही, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं.
Read also:
- ‘ज्यांनी रातोरात आमचे नगरसेवक चोरले ते काय मदत करणार?’ – संदीप देशपांडे
- “ते सोबत असले तर आम्हाला काही चिंता नाही, सुरक्षा आपोआपच मिळेल”; नांदगावकरांचा संजय राऊतांना टोला
- आदित्य ठाकरे अयोध्येला जाताहेत, कुणाची इच्छा असेल तर..; राऊतांची राज ठाकरेंवर खोचक टिप्पणी
- “ठाकरे सरनेम होनेपर भी वो ब्रिजभूषण से डर जायेगा”; राष्ट्रवादीने अयोध्या दौऱ्यावरून मनसेला डिवचलं
- “महिला पोलिसाला धक्का लागला असेल तर राजकारण सोडून देईन”; संदीप देशपांडेंचं खुलं आव्हान