मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा बहुचर्चित अयोध्या दौरा स्थगित करण्यात आला आहे. याबाबतची माहिती खुद्द राज ठाकरे यांनीच ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. प्रकृतीच्या कारणास्तव राज यांनी आपला दौरा रद्दकेल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तसेच पुण्यातील सभेमध्ये आपण यावर सविस्तर बोलणार असल्याचे राज यांनी महाराष्ट्र सैनिकांना म्हटले आहे.
“पवारांचा डाव वेळीच ओळखा, हे पवार मराठ्यांचे कधीच झाले नाही”; निलेश राणेंचा संभाजीराजेंना सल्ला
राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा रद्द झाला. यावरून मात्र आता शिवसेनेकडून टीकास्त्र सोडले जात आहे. राज यांना अयोध्या दौऱ्यासाठी मदत लागली असती तर शिवसेनेने नक्कीच सहकार्य केले असते, अशा शब्दात संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना चिमटा काढाला
“महिलांवर हात उगाराल तर हात तोडून हातात देऊ”; सुप्रिया सुळे संतापल्या
यावर मनसे नेते बाळा नांदगावकरांनी संजय राऊत याना टोमणा मारत उत्तर दिले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा रद्द झाला. यावर उलटसुलट चर्चा करण्याची आवश्यकता नाही. ते 22 तारखेला बोलणारच आहेत. त्यावेळी ते दौरा रद्द का केला, याबद्दल सांगतील, अशी माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली
संभाजीराजे राज्यसभेचा मार्ग सुकर करण्यासाठी शिवबंधन बांधणार?
राज ठाकरे यांनी पुणे दौरा आटोपता घेतला. तसेच अयोध्या दौरा रद्द केला, या पार्श्वभूमीवर बाळा नांदगावकर माध्यमांशी बोलत होते. अयोध्या दौऱ्याला सुरक्षा हवी असल्यास आम्ही पुरवतो, असे विधान शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले होते. त्यालाही बाळा नांदगावकर यांनी प्रत्युत्तर दिले. आता एवढेच बाकी राहिले होते, असे म्हणत त्यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली. महाभारतातही संजय होता ना. मग ते सोबत असले तरी आम्हाला काही चिंता नाही. सुरक्षा आपोआपच मिळेल आम्हाला. त्यामुळे त्यांनी आमच्या सोबत यावे, असा टोला त्यांनी लगावला.
Read also:
- आदित्य ठाकरे अयोध्येला जाताहेत, कुणाची इच्छा असेल तर..; राऊतांची राज ठाकरेंवर खोचक टिप्पणी
- “ठाकरे सरनेम होनेपर भी वो ब्रिजभूषण से डर जायेगा”; राष्ट्रवादीने अयोध्या दौऱ्यावरून मनसेला डिवचलं
- “महिला पोलिसाला धक्का लागला असेल तर राजकारण सोडून देईन”; संदीप देशपांडेंचं खुलं आव्हान
- राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित; ‘या’ कारणांमुळे मनसेने दौरा पुढे ढकलला
- “आमचा गुडलक म्हणून तुम्ही सत्तेत”; नाना पटोलेंचा आदित्य ठाकरेंना टोला