मुंबई : राज्यात महापालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत, मात्र त्याआधीच महाविकास आघाडीमध्ये धुसफुस सुरू झाली आहे. वार्ड रचनेवरून काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नाराजी व्यक्त केलीय. राष्ट्रवादी आणि शिवसेनेने आपल्या सोयीनुसार महापालिकेत वार्ड रचना केली असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला होता. तसेच मुंबई पालिकेबाबत त्यांनी आता आदित्य ठाकरे यांना टोला लगावला.
“रोहित पवारांनी महाराष्ट्राला सुसंस्कृतपणा शिकवु नये”; गोपीचंद पडळकरांचा रोहित पवारांना सल्ला
मुंबई आमची सत्ता असताना मुंबई कधीही तुंबली नाही. मात्र सध्या मुंबई अवस्था खुप वाईट झाली आहे. यावर आदित्य ठाकरे यांनी नाना पटोले यांना प्रत्युत्तर दिलं. त्याला आता 25 वर्ष उलटली आहेत. आता ते सोबतच आहेत. त्यामुळे बघुया त्यांचं गुडलक कामाला येतंय का? असा खोचक टोला आदित्य ठाकरे यानी नाना पटोले यांना लगावला आहे.
“प्रयत्न करणे आपल्या हातात आहे”; OBC आरक्षणाबाबत अजित पवारांंनी दिली मोठी माहिती
आदित्य ठाकरे यांनी काॅंग्रेसच्या बाजूने मत मांडलं आहे. परंतु आमचा गुडलक आहे म्हणून तुम्ही सत्तेत आहात. आमदार निधी वाटपात भेदभाव होणे हा गंभीर प्रश्न आहे. ठरल्याप्रमाणे निधी वाटप होणे गरजेचे आहे. काॅंग्रेसने निधी वाटपात होण्याच्या तक्रारी अनेक वेळा केल्या आहेत. या गोष्टीमुळे समाजात चुकीचा मॅसेज जात असल्याने हे प्रश्न भविष्यात घडू नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका निश्चित करावी, असंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
“एका रात्रीत हिंदुत्ववादी झाले अन् अयोध्येला निघाले, बृजभूषण लढवय्या माणूस”; संजय राऊत
दरम्यान, आगामी काही काळात महापालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या आहे. त्यामुळे राजकीय पक्ष त्याची जोरदार तयारी करताना दिसत आहे. येणाऱ्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्रिपणे लढणार का? य़ा प्रश्नांवर अजूनही शिक्कामार्तोब झाला नाही. मात्र सध्या राज्याची परिस्थिती पाहता महाविकास आघाडी सोबतच निवडणुका लढविणार असल्याचे चित्र सध्या राज्यात दिसत आहे.
Read also:
- राज ठाकरे भेट न घेताच मुंबईला का गेले? वसंत मोरेंनी सांगितले कारण
- काॅंग्रेसकडून प्रकाश आंबेडकरांना राज्यसभेची उमेदवारी; वंचितने दिला चर्चेंला पुर्णविराम
- मनसे नेते संतोष धुरी आणि संदीप देशपांडे यांना जामीन मंजूर; न्यायालयाने घातल्या ‘या’ अटी
- नवज्योत सिंग सिद्धूला एक वर्षाचा कारवास; ‘या’ प्रकरणी सर्वोच्च न्यायालायने सुनावली शिक्षा
- “तर आम्ही सर्व फडणवीसांसोबत आहोत”