मुंबई : निवडणुक आयोगाने अलिकडेच राज्यसभांच्या 51 जागांसाठी निवडणुक प्रक्रिया जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रात येत्या काही दिवसांत 6 जागांसाठी निवडणुक होणार आहे. यामध्ये कोणत्या नेत्याला उमेदवारी मिळणार त्यासाठी चांगलीच चढाओढ बघायला मिळत आहे. काॅंग्रेसकडून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र त्यावर आता वंचित बहुजन आघाडीने त्या चर्चाना पुर्णविराम दिला आहे.
“एका रात्रीत हिंदुत्ववादी झाले अन् अयोध्येला निघाले, बृजभूषण लढवय्या माणूस”; संजय राऊत
निवडणुका जवळ आल्या की काॅंग्रेसमधील एक गट खोट्या बातम्या पेरण्याचे काम करीत असतो. अशा खोट्या बातम्या पेरून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण कऱण्याचा व वंचित बहुजन आघाडीची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना काॅंग्रेेसकडून राज्यसभेची उमेदवारी मिळणार असल्याची बातमी प्रसारित कऱण्यात आली आहे. या बातमी मध्ये काहीही तथ्य़ नाही. काॅंग्रेसकडून आम्हाला असा कोणताही प्रस्ताव प्राप्त झालेला नाही. असं वंचितचे नेते सिद्धार्थ मोकळे यांनी म्हटले आहे.
“पुरून उरेन तुम्हाला ‘चित्रा वाघ’ म्हणतात मला”; चित्रा वाघ यांचा राष्ट्रवादीला अप्रत्यक्ष टोला
शिवसेनेकडून संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, काॅंग्रेसचे पी, चिदंबरम यांची मुदत संपली आहे. तर भाजपकडून विनय सहस्त्रबुद्धे, पियुष गोयल आणि विकास महात्मे यांची मुदत संपत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल, शिवसेनेकडून संजय राऊत यांना त्यांच्या पक्षाकडून पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. या 6 जागांसाठी 31 मे पर्यंत अर्ज करण्य़ाची शेवटची मुदत आहे. तर 10 जून रोजी मतदान होणार आहे.
दरम्यान, भाजप 2, राष्ट्रवादी काॅंग्रेस , काॅंग्रेस, आणि शिवसेनेला यांना प्रत्येकी 1 जागा निवडून आणता येईल, मात्र सहाव्या जागेसाठी प्रत्येक पक्षाला इतर सदस्यांच्या मतांची गरज पडणार आहे. अलिकडेच सातारा येथील खासदार संभाजी राजे यांनी अपक्ष म्हणून निवडणुक लढवणार असल्याचं जाहिर केलं आहे. मात्र पेच अजूनही तसाच असून सहावी जागा शिवसेनाच लढविणार असल्याचं वक्तव्य संजय राऊतांनी केला आहे.
Read also:
- मनसे नेते संतोष धुरी आणि संदीप देशपांडे यांना जामीन मंजूर; न्यायालयाने घातल्या ‘या’ अटी
- नवज्योत सिंग सिद्धूला एक वर्षाचा कारवास; ‘या’ प्रकरणी सर्वोच्च न्यायालायने सुनावली शिक्षा
- “तर आम्ही सर्व फडणवीसांसोबत आहोत”
- “रोहित पवारांनी महाराष्ट्राला सुसंस्कृतपणा शिकवु नये”; गोपीचंद पडळकरांचा रोहित पवारांना सल्ला
- “प्रयत्न करणे आपल्या हातात आहे”; OBC आरक्षणाबाबत अजित पवारांंनी दिली मोठी माहिती