मुंबई : गेल्या काही दिवसापासून शिवसेना आणि भाजपमध्ये राजकीय संघर्ष वाढतच चालला आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काॅंग्रेसने देखील या राजकीय संघर्षात प्रत्यक्षपणे उडी घेतली असून राजकीय रंगत आता मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. मुंबई महापालिकेचे वार्ड रचना जाहीर झाली असून त्यावरून आता राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी थेट भाजप नेत्या चित्रा वाघ यांना मुंबई महानगर पालिका निवडणुक लढविण्याचे आव्हान दिले आहे.
ताईंनी लेन्स बदलून आघाडीत आल्या तर बंर होईल; धनंजय मुंडेंची पंकजा मुंडेंना खुली ऑफर
विद्या चव्हाण यांनी चित्रा वाघ यांच्या शेलक्या शब्दात टिप्पणी केली आहे. त्यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, अफाट लोकप्रिय असणाऱ्या “लोकनेत्या” स्वतःवर व बदलेल्या पक्षावर विश्वास असेल तर पोपटपंची बंद करून चित्रा वाघ यांनी मुंबई महानगर पालिकेच्या कुठल्याही वार्डातून निवडणूक लढवून दाखवावी. त्यामुळे विद्या चव्हाण यांनी दिलेलं आव्हान चित्रा वाघ स्वीकारणार का ? ते आता पाहावं लागणार आहे. तसेच चित्रा वाघ यांनी लगेच विद्या चव्हाण यांना अप्रत्यक्ष प्रत्युत्तर देत टोला लगावला आहे.
“महाराष्ट्रातही ओबीसी आरक्षणासहीत निवडणुका होणार”, भुजबळांनी व्यक्त केला विश्वास
मेरे सच को नागवार तेरे झूठ की गवाही है, करते रहेना छोटी बाते… यह तो ‘तेरी फितरत है, और ‘तेरी हर ओछि बात का जवाब देना यह तो मेरी तौहीन है. एक गेली आता दुसरी आली. काळजी नको. पुरून उरेन तुम्हाला “चित्रा वाघ” म्हणतात मला, असं म्हणत चित्रा वाघ यांनी विद्या चव्हाण यांना एक प्रकारे इशाराच दिला आहे.
राऊत- सोमय्या वाद चिघळला; किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा यांची याचिका कोर्टात दाखल..
दरम्यान, आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे यासारख्या शहारांसह एकुण 15 महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे सध्या राजकीय नेते त्यासाठी जोरदार तयारी करताना दिसत आहे.
Read also:
- “पावसाचं कारण सांगून मैदान सोडले, भोंग्याचे कारण सांगून देशपांडे पळाले”
- राज ठाकरेंची पुण्यातील सभा रद्द; राज ठाकरे लगेचच मुंबईकडे रवाना
- गळ्याला कोरडं पडलं अन् सोलापुरचा पाणी बारामतीला; पालकमंत्र्यांच्या फोटोला कुंकवाचा अभिषेक घालत आपचा जाहीर निषेध
- “महिलांवर हात उगाराल तर हात तोडून हातात देऊ”; सुप्रिया सुळे संतापल्या
- “OBC आरक्षणासाठी केंद्राचा कोणताही संबंध नाही, फक्त प्रस्थापितांच्या आघाडीला देण्याची इच्छा नाही”