पुणे : राज ठाकरे यांची पुण्यातील सभा रद्द करण्याचा निर्णय मनसेने घेतला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामधील जो काही कलगीतुरा रंगणार होता. त्याला तात्पुरता विराम मिळाला आहे. सभा रद्द झाल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे लगेचच मुंबईकडे रवाना झाले. त्यामुळे राज ठाकरे यांच्या सभेसाठी आतूर असणाऱ्यांची जराशी निराशाच झाल्याचं सध्या चित्र आहे.
राऊत- सोमय्या वाद चिघळला; किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा यांची याचिका कोर्टात दाखल..
पुण्यातील सभेसाठी पोलीस आयुक्तांनी काही अटी घालून दिल्या होत्या. सभा घ्यायची असेल तर आयुक्तांनी घालून दिलेल्या नियमांचे पालन देखील करावे लागणार आहे. अशा सुचना गृहमंत्र्यांनी देखील दिल्या होत्या. मात्र पावसाचे कारण देत ही सभा रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याचा मनसेने डेक्कन पोलिसांना दिलेल्या पत्रात म्हटलं आहे. या सभेसाठी राज ठाकरे यांचा चार ते पाच दिवसांचा मुक्काम पुण्यात ठरला होता. मात्र राज ठाकरे लगेचच मुंबईकडे रवाना झालेत.
OBC आरक्षणाला झारीतल्या शुक्राचार्यांचा विरोध; बावनकुळेंचा शरद पवारांवर निशाणा
राज ठाकरे यांची पुण्यातील सभा डेक्कन जिमखान्याच्या परिसरातील मुठा नदीपात्रात घेण्याचे नियोजन होते. . त्यासाठी मनसेकडून वेगाने हालचाली देखील सुरू केल्या. याठिकाणी सभा घेतल्यास वाहतुक कोंडी प्रश्न निर्माण होणार नाही. तसेच याठिकाणी स्टेज, बॅरिकेट आणि विद्युत व्यवस्थेसाठी मनोरे उभारण्यासाठी परवानगी द्यावी, तसेच स्पीकरच्या वापरासाठी परवानगी द्यावीस असे निवेदन मनसेकडून डेक्कन जिमखाना पोलीस ठाण्यात देण्यात आलं.
ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; मध्यप्रदेश सरकारलाही दिला हिरवा कंदील
दरम्यान, अलिकडील सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांचा उल्लेख मुन्नाभाई केला होता. हिंदुत्वाच्या भूमिकेवरून देखील मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता. त्यामुळे आगामी सभेत यावरून मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल करण्याची शक्यता होती. तसेच राज ठाकरे यांनी काल पत्रकारांना उद्देशून देखील म्हटलं होतं की जगू द्या. त्यामुळे राज ठाकरेंच्या याबाबत सध्या एकच चर्चा सुरू आहेत.
Read also:
- गळ्याला कोरडं पडलं अन् सोलापुरचा पाणी बारामतीला; पालकमंत्र्यांच्या फोटोला कुंकवाचा अभिषेक घालत आपचा जाहीर निषेध
- “महिलांवर हात उगाराल तर हात तोडून हातात देऊ”; सुप्रिया सुळे संतापल्या
- “OBC आरक्षणासाठी केंद्राचा कोणताही संबंध नाही, फक्त प्रस्थापितांच्या आघाडीला देण्याची इच्छा नाही”
- ताईंनी लेन्स बदलून आघाडीत आल्या तर बंर होईल; धनंजय मुंडेंची पंकजा मुंडेंना खुली ऑफर
- “महाराष्ट्रातही ओबीसी आरक्षणासहीत निवडणुका होणार”, भुजबळांनी व्यक्त केला विश्वास