मुंबई : प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या रघुनाथ नेत्रालयाच्या उद्घाटन मुंबईत पार पाडलं. यावेळी भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली. तसेच धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना थेट महाविकास आघाडीत येण्याचे संकेत दिले. त्यामुळे सध्या त्यांच्या या वक्तव्याची चर्चा सध्या खुप जोरात सुरू आहे. यावेळी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार काॅंग्रेस नेते बाळासाहेब थोरात, पंकजा मुंडे, खासदार प्रितम मुंडे, आदित्य ठाकरे उपस्थित होते.
काॅंग्रेसला पुन्हा एकदा गुजरातमध्ये मोठा धक्का! हार्दिक पटेलने दिला राजीनामा
यावेळी पंकजा मुंडे भाषणाची सुरूवात करताना म्हणाल्या की, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आमचे बंधू धनंजय मुंडे यांनी मुंडे महाजनांच्या लेन्समधून स्वत:ला मोठं करत करत आज शरद पवारांच्या लेन्समधून बघण्याचं भाग्य खुप कमी लोकांना लाभलं आहे. ते भाग्य त्यांना लाभंल आहे. तसेच माझ्या लेन्सेस मधून बघून सध्या समाधान मानत आहेत. त्या खासदार प्रितम मुंडे देखील याठिकाणी उपस्थित आहेत. असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
संभाजी राजेंचं आमदारांना खुल पत्र; म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, आंबेडकर”..;
पंकजा मुंडे यांना प्रत्युत्तर देत धनंजय मुंडे यांनी देखील पंकजा मुंडे यांना टोला लगावला. धनंजय मुंंडे म्हणाले की, त्या काळात स्वत:च्या पक्षाचे एक आपले सहकारी दोन वेळा निवडून आले आणि त्यांचे जावई आज नेत्ररूग्ण काढताहेत. त्या रूग्णालयाच्या उद्घाटनाला आपण गेलं पाहिजे, यापेक्षा मोठेपणा नाही. त्यामुळे कधीतरी ताई या लेन्सच्या फोकसमध्ये आपल्याला यावं लागतं. त्यामुळे कदाचित ताईंनी लेन्स बदलल्यात आणि महाविकास आघाडीच्या लावल्या तर बरं होईल. अशी मिश्किल टिप्पणी धनंजय मुंडे यांनी केली. त्यावेळी सभागृहात एकदमच टाळ्यांचा आवाज आला.
दरम्यान, डॉ. लहाने यांनी लाखो शस्त्रक्रिया केल्या, कित्येकांना दृष्टी दिली, या साऱ्या गोष्टींचा आलेख सर्वश्रृत आहे. एखाद्या अंध व्यक्तीची शस्त्रक्रिया झाल्यानंतर जेव्हा त्याच्या डोळ्यावरची पट्टी काढली जाते आणि तो पहिल्यांदा जग पाहतो, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावेनासा असतो. अशा अनेकांच्या चेहऱ्यावरचा आनंद डॉ. लहानेंनी आपल्या कष्टांनी निर्माण केला. त्यांनी कधीही पैशाची अपेक्षा केली नाही. धनसंपत्तीचा विचार न करता एखाद्याला नेत्रदृष्टीचे धन प्राप्त करून देणे हे डॉ. लहानेंचे ध्येय होते. असे मत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी व्यक्त केले.
Read also:
- “महाराष्ट्रातही ओबीसी आरक्षणासहीत निवडणुका होणार”, भुजबळांनी व्यक्त केला विश्वास
- राऊत- सोमय्या वाद चिघळला; किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा यांची याचिका कोर्टात दाखल..
- OBC आरक्षणाला झारीतल्या शुक्राचार्यांचा विरोध; बावनकुळेंचा शरद पवारांवर निशाणा
- ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; मध्यप्रदेश सरकारलाही दिला हिरवा कंदील
- “इतिहास नोंद ठेवेल, बाळासाहेबांच्या पोराने औंरग्याच्या कबरीला संरक्षण पुरवलं”