मुंबई – किरीट सोमय्या आणि संजय राऊत या दोघांमधला वाद चांगलाच चिघळला असून आता हा वाद कोर्टात पोहोचला आहे. किरीट सोमय्या यांच्यासह त्यांची पत्नी आणि मुलावरही संजय राऊतांनी घोटाळ्याचे आरोप केले होते. त्यावरूनच सोमय्यांनी थेट कोर्टात धाव घेत मानहानीची याचिका दाखल केली आहे यावेळी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी माध्यमांशी संवाद साधत संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार फटकेबाजी केली
“आहो तुमचे नेतेच बहिरे झाले आहेत आधी त्यांना पहा”, चंद्रकांत खैरे यांचा फडणवीसांवर पलटवार
किरीट सोमय्या म्हणाले, संजय राऊत यांनी आम्हाला घाबरवण्यासाठी घोटाळ्याचे आरोप केले. त्याविरोधात आज आम्ही मानहानीकारक याचिका दाखल केली आहे. मेधा सोमय्या यांची याचिका कोर्टाने दाखल करून घेतली आहे. याबद्दलची प्रक्रिया सुरू झाली आहे. २६ मे रोजी पुढची सुनावणी होणार आहे. मला विश्वास आहे की, संजय राऊतांना समन्स जाणार. संजय राऊत म्हणजे उद्धव ठाकरे आहेत. कारण भोंगा, आरडाओरडा संजय राऊत पण चौकशीचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. काय झालं? चार महिन्यात काहीच सिद्ध झाले नाही. इतका तमाशा केल्यानंतर एक रुपयाचाही घोटाळा निघाला नाही. सजा भोंग्याला होणार उत्तर उद्धव ठाकरेंना मिळणार. आम्ही यावेळी यांना सोडणार नाही.”
2024 चा मुख्यमंत्री ब्राम्हण समाजाचा असावा; रावसाहेब दानवेंनंतर आठवलेंचं वक्तव्य
सोमय्या पुढे म्हणाले, “शिवसेना नेते संजय राऊत यांनी दहशत/भीती निर्माण करण्यासाठी मला बदनाम करण्यासाठी १०० कोटी शौचालय घोटाळ्याचे खोटे आरोप करीत आहेत, त्याच्या विरोधात कारवाई करण्यात यावी.” असा मानहाणीचा खटला मेधा सोमैया यांनी आज शिवडी, मुंबई कोर्टात दाखल केला आहे”.
Read also:
- “मध्यप्रदेशला OBC आरक्षणाला मान्यता दिली, मग महाराष्ट्राला का नाही?”
- “राष्ट्रवादी, शिवसेनेने आपल्या सोयीनुसार वार्ड रचना केली; यासाठी न्यायालयात देखील जाऊ; नाना पटोले
- OBC आरक्षणाला झारीतल्या शुक्राचार्यांचा विरोध; बावनकुळेंचा शरद पवारांवर निशाणा
- ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; मध्यप्रदेश सरकारलाही दिला हिरवा कंदील
- “इतिहास नोंद ठेवेल, बाळासाहेबांच्या पोराने औंरग्याच्या कबरीला संरक्षण पुरवलं”