औरंगाबाद : गेल्या काही दिवसापासून औरंगाबाद येथील औरंगाजेबच्या कबरीभोवती राज्यातील राजकारण फिरत आहे. एमआयएमचे आमदार अकबरूद्दीन ओवेसी आणि खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाजेबच्या कबरीसमोर नतमस्तक आणि फुल वाहिल्यामुळे राज्यातील राजकारण चांगलचं तापलं. अशातच आता मनसेने औरंगाजेबची कबर उखडून टाकण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे कबरीला आता संरक्षण पुरवण्यात आलं आहे. यावरून भाजप नेते नितेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
ममता दीदींच्या पावलावर ठाकरे सरकारचे पाऊलं; केंद्र सरकारच्या विरूद्ध धडक कृती मोहीम
अकबरूद्दीन ओवेसीने राज्यात औरंगाजेबच्या कबरीसमोर नतमस्तक झाल्याने नवा वाद ओढवून घेतला. त्यावर मनसेने औरंगाजेबची कबर उखडून टाकण्याची भाषा केली आहे. त्यामुळे आता त्याठिकाणी स्थानिक लोकांकडून आणि पोलिसांकडून औरंगाजेबच्या कबरील संरक्षण पुरवण्यात आली आहे. त्यावरून इतिहास नोंद ठेवेल बाळासाहेबांच्या पोराने औंरग्याच्या कबरीला संरक्षण पुरवलं होतं. असं टोला भाजप नेते नितेश राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
“महागाईमुळे सध्या आमच्या घरात लिंबू सरबत बनतच नाही”; सुप्रिया सुळे
राज्यातील सर्वच राजकीय नेत्यांनी बाहेरच्या लोकांनी येऊन महाराष्ट्रातील शांतता बिघडू नये असं वक्तव्य केले होते. मात्र आता हे प्रकरण शांत होण्यास तयार नसून स्थानिक नागरकही आक्रमक झाले आहेत. या ठिकाणची कबर उखडून टाका अशी मागणीही पुढे आली आहे. तर या मागणीमुळे पोलिसांनी कबरीच्या अवतीभोवती पोलिस बंदोबस्त लावला असून कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलीस लक्ष ठेवून आहेत.
ज्या ठिकाणी पाऊस होणार नाही, तिथे निवडणुका घ्या; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
दरम्यान, गेल्या काही दिवसापासून राज्यातील राजकीय वातावरण एक वेगळ्याच वळणावर गेलं आहे. मशिदीवरील भोंगे, हनुमान चालिसा आणि आता औरंगाजेबची कबर, यामुळे राजकारण ढवळून निघालं आहे.
इतिहास नोंद ठेवेल बाळासाहेबांच्या पोराने औरंग्याच्या कबरीला संरक्षण पुरवलं होत. pic.twitter.com/XjnHjlr3fJ
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) May 17, 2022
Read also:
- काॅंग्रेसला पुन्हा एकदा गुजरातमध्ये मोठा धक्का! हार्दिक पटेलने दिला राजीनामा
- संभाजी राजेंचं आमदारांना खुल पत्र; म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, आंबेडकर”..;
- “अंडी फेकण्याची संस्कृती शरद पवारांनीच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये रुजवली की..”; चंद्रकांत पाटलांचं रोहित पवारांना प्रत्युत्तर
- शरद पवारांच्या समंतीने राज्यात पुरस्कृत दहशतवाद; भाजपचा राष्ट्रवादीवर गंभीर आरोप
- “दुसऱ्या पक्षाचं ऐकून राज ठाकरे यांनी स्वत:ची ओरिजिनॅलिटी हरवून नये”; रोहित पवारांचा सल्ला