सोलापुर : उजनी धरणातील पाणी बारामती, इंदापुरला देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे आता आम आदमी पक्षाने सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आम आदमी पक्षाने आंदोलन केलं. यावेळी आम आदमी पार्टीने पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पोस्टरला कुंकवाचा अभिषेक घालत जाहीर निषेध व्यक्त केला. तसेच मोठ्या आवाजात यावेळी घोषणाबाजी देखील करण्यात आली.
OBC आरक्षणाला झारीतल्या शुक्राचार्यांचा विरोध; बावनकुळेंचा शरद पवारांवर निशाणा
पालकमंत्री यांनी जो उजनी धरणाचा पाणी बारामती, इंदापुर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा आम्ही जाहीर निषेध केला आहे. तसेच सोलापुरचं हक्काचा पाणी कुणीही घेऊ जाऊ शकत नाही. आज सोलापुरातील महिलांना पाच ते सात दिवस पाणी भरायलं लागतं. त्या महिला रात्रं जागून पाणी भरतात. परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. सोलापुरचे आयुक्त म्हणताहेत की, आमच्याकडे पाणी कमी आहे. अशी परिस्थिती असताना सोलापुरचा पाणी बारामतीला जात असेल तर त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो असं आम आदमी पार्टीचे जिल्हाअध्यक्ष सागर पाटील यांनी सांगितले आहे.
ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; मध्यप्रदेश सरकारलाही दिला हिरवा कंदील
अलिकडेच आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी उजणी धरणाच्या पाण्याबाबत आंदोलन केलं होतं. त्यामुळे आम आदमीच्या दोन कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पाण्याची अत्यंत वाईट असताना सोलापुरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे बारामतीला पाणी नेत आहेत. कुठल्या प्रशासनाला किंवा पालकमंत्र्यांना सोलापुरकरांना पाणी देत होत नसेल तर तुम्ही राजीनामा द्या, आम्ही रोज सोलापुरकरांना पाणी देऊ, तसेच पाणीपट्टी, घरपट्टी देखील माफ करू, असंही सागर पाटील यांनी सांगितलं.
“इतिहास नोंद ठेवेल, बाळासाहेबांच्या पोराने औंरग्याच्या कबरीला संरक्षण पुरवलं”
दरम्यान, उजनी धरणाच्या पाण्याबाबत सोलापुरामध्ये राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. उजनी धऱणाच्या पाण्याबाबतचा मुद्दा खुप दिवसापासून चर्चेत आहे. त्यामुळे आम आदमी पार्टीची पुढची भूमिका काय असणार ते आता पहाणं महत्वाचं ठरणार आहे.
Read also:
- “महिलांवर हात उगाराल तर हात तोडून हातात देऊ”; सुप्रिया सुळे संतापल्या
- “OBC आरक्षणासाठी केंद्राचा कोणताही संबंध नाही, फक्त प्रस्थापितांच्या आघाडीला देण्याची इच्छा नाही”
- ताईंनी लेन्स बदलून आघाडीत आल्या तर बंर होईल; धनंजय मुंडेंची पंकजा मुंडेंना खुली ऑफर
- “महाराष्ट्रातही ओबीसी आरक्षणासहीत निवडणुका होणार”, भुजबळांनी व्यक्त केला विश्वास
- राऊत- सोमय्या वाद चिघळला; किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा यांची याचिका कोर्टात दाखल..