जळगाव – पुण्यात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात गोंधळ झाला. पुण्याच्या बालगंधर्व मंदिरात स्मृती इराणी यांच्या उपस्थितीत पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम सुरू असताना राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी घुसून घोषणाबाजी केल्याची घटना घडली. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या वैशाली नागवडे यांना मारहाण करण्यात आली. अमित शाह यांच्या आयुष्यावरील एका पुस्तकाच्या प्रकाशनासाठी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी पुण्यात आल्या होत्या. या कार्यक्रमावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आंदोलन केलं. यानंतर भाजपा आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यांच्यात जोरदार सामना झाला. या प्रकरणावरराष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी भाष्य केलं.
क्योंकी गॅस भी कभी सस्ती थी, स्मृती जी याद है ना; स्मृती इराणीविरोधात राष्ट्रवादीचा मोठा राडा
“महागाईच्या मुद्यावर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या भेटीचा आग्रह धरणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांवर पुणे येथे भाजपच्या कार्यकर्त्यांनी हात उगारला. पक्ष किंवा राजकीय विचार काहीही असो; पण महिलांचा अवमान कोणत्याच परिस्थितीत सहन करणार नाही. कुठल्याही पक्षाच्या महिलेवर हात उगारला तर हात तोडून त्याच्या हातात देईन”, असा इशारा खा. सुप्रिया सुळे यांनी दिला.
संभाजीराजेंचा राज्यसभेचा मार्ग सुकर; शरद पवारांचा संभाजीराजेंना पाठिंबा
भाजपच्या एका नेत्याने महिलेवर हात उगारला. ही आपली संस्कृती आहे का ? यापुढे जर असा कुठेही प्रकार झाला तर आपण स्वत: पुढे येऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करू. महिलांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. ही प्रवृत्ती कुठेतरी थांबायला हवी. कायद्याने आपण न्याय मागणार आहोत. जोपर्यंत त्या तिघांना शिक्षा होत नाही, तोपर्यंत आम्ही थांबणार नाही, असे खासदार सुळे यांनी सांगितले.
कार्ती चिंदमबरम यांच्या तब्बल 11 ठिकाणी सीबीआयचे छापे; चिंदमबरम यांच्या अडचणीत वाढ
दरम्यान, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पुणे विभागीय अध्यक्षा वैशाली नागवडे यांना मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला होता. या प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैशाली नागवडेंसह राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांना भाजपाच्या काही पुरुष नेत्यांकडून मारहाण केल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्याआधारे पोलिसांनी तिघांवर मारहाण, विनयभंग आणि कलम ५०४, ५०६ आणि ३४ नुसार कारवाई करण्यात आली आहे.
Read also:
- OBC आरक्षणाच्या अपयशाची जबाबदारी स्वीकारून उद्धव ठाकरेंनी पदाचा राजीनामा द्यावा; चंद्रकांत पाटील
- “OBC आरक्षणासाठी केंद्राचा कोणताही संबंध नाही, फक्त प्रस्थापितांच्या आघाडीला देण्याची इच्छा नाही”
- ताईंनी लेन्स बदलून आघाडीत आल्या तर बंर होईल; धनंजय मुंडेंची पंकजा मुंडेंना खुली ऑफर
- “महाराष्ट्रातही ओबीसी आरक्षणासहीत निवडणुका होणार”, भुजबळांनी व्यक्त केला विश्वास
- राऊत- सोमय्या वाद चिघळला; किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा यांची याचिका कोर्टात दाखल..