नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यापासून केंद्रीय तपास यंत्रणा चांगल्याच सक्रीय झाल्या आहेत. महाराष्ट्रात एव्हाना देशात अनेक राजकीय नेत्यांवर सध्या केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा पाठीमागे लागला आहे. आज काॅंग्रेसचे नेते आणि माजी पी.चिंदमबरम यांच्या घरी पुन्हा एकदा सीबीआयने छापे टाकले आहेत. त्यामुळे त्यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात पी.चिंदमबरम यांनी ट्विट करत नाराजी देखील व्यक्त केली आहे.
आरोग्यमंत्र्यांनी दाखवली संवेदनशीलता; अपघातग्रस्तच्या मदतीला आले धावून; व्हिडीओ व्हायरल
आज पहाटे 6 वाजताच पी.चिंदमबरम यांच्या तब्बल 11 ठिकाणी सीबीआयने छापे टाकले आहेत. पी. चिदंबरम यांच्याविरोधात 2010-14 दरम्यान झालेल्या विदेशी व्यवहारासंदर्भात तपास संस्थेने नवीन गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळेच त्यांच्या घरावर छापे टाकण्यात आले आहेत. तसेच कार्ती चिंदबरम यांची अनेक प्रकरणांमध्ये चौकशी केली जात आहे. ज्यात आयएऩक्स मीडियाने विदेशी गुंतवणुक प्रोत्साहन मंडळाच्या मंजूरीने परदेशातून 305 कोटी रूपये मिळवल्याचा प्रकरणाचा समावेश आहे.
“जो बायकोचा होऊ शकला नाही तो महाराष्ट्राचा काय होणार”; उद्धव ठाकरेंवर सोमय्यांनी केली बोचरी टीका
कार्ती चिंदमबरम यांचे वडिल पी चिदंबरम त्यावेळी देशाचे अर्थमंत्री होते. कार्ती चिंदमबरम यांनी या छाप्यांवर प्रतिक्रिया दिली आहे. आता मी मोजणी थांबवली आहे. हे किती वेळा घडले? याचीही नोंद व्हायला हवी, असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. कार्ती यांच्या चेन्नई, मुंबई, तामिळनाडू, पंजाब, ओडीशा अशा एकुण 11 ठिकाणी सीबीआयने छापे टाकले आहेत. त्यामुळे तपासात पुढे काय माहिती येणार ते आता पहाणं महत्वाचं ठरणार आहे.
नेहमीप्रमाणे मुंबईला तुंबई म्हणून जागतिक स्तरावर बदनाम करणार का? नितेश राणेंचा तिखट सवाल
दरम्यान, गेल्या काही महिन्यापासून महाराष्ट्रात देखील राजकीय नेत्यांच्या घरी केंद्रीय तपास यंत्रणांनी छापे टाकले आहे. तर माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि अल्पसंख्यांक मंत्री गैरव्यवहार प्रकरणी सध्या तुरूंगात आहेत.
Read also:
- क्योंकी गॅस भी कभी सस्ती थी, स्मृती जी याद है ना; स्मृती इराणीविरोधात राष्ट्रवादीचा मोठा राडा
- “शिवसंपर्क अभियान नव्हतं तर शिव्या संपर्क भाषण होतं”
- “यांना रावणांची देखील उपमा देऊ शकत नाही”, नारायण राणेंची मुख्यमंत्र्यांवर बोचरी टिका
- ”गेल्या अडीच वर्षात NCP कडून काँग्रेसला संपवण्याचा प्रयत्न”; राष्ट्रवादीवर गंभीर आरोप करत नाना पटोलेंची थेट हायकमांडकडे तक्रार
- “आहो तुमचे नेतेच बहिरे झाले आहेत आधी त्यांना पहा”, चंद्रकांत खैरे यांचा फडणवीसांवर पलटवार