पुणे : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी पुणे दौऱ्यावर आल्या असताना त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठा राडा घातला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक देखील केली आहे. त्यावेळी राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. हाय हाय मंहगाई मोदीजीने लाई, जबसे भाजपा सत्ता में आयी, कमरतोड महंगाई लायी. क्योंकी गॅस भी कभी सस्ती थी, स्मृती जी याद है ना, अशा प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या.
“जो बायकोचा होऊ शकला नाही तो महाराष्ट्राचा काय होणार”; उद्धव ठाकरेंवर सोमय्यांनी केली बोचरी टीका
बालगंधर्व याठिकाणी एका पुस्तकाच्या प्रकाशनासाठी स्मृती इराणी आल्या. त्यावेळी कार्यक्रम चालू असताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सभागृहातच मोठा राडा घातला. यावेळी पुणे शहर महिला काॅंग्रेसने देशातील वाढत्या महागाईवरून जोरदार आंदोलन केलं. यावेळी त्यांनी स्मृती इऱाणी यांना चुल व बांगड्या भेट देण्यासाठी कार्यक्रमाच्या स्थळी आणल्या होत्या. मात्र पोलिसांनी पुणे शहर महिला अध्यक्षा पुजा आनंद यांच्यासह महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.
नेहमीप्रमाणे मुंबईला तुंबई म्हणून जागतिक स्तरावर बदनाम करणार का? नितेश राणेंचा तिखट सवाल
बालगंधर्व याठिकाणी झालेल्या राड्यात राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांना भाजपकडून मारहाण झाल्याचा देखील आरोप होत आहे. यावर बोलताना स्मृती ईऱाणी म्हणाल्या की, काॅंग्रेस अध्यक्ष हटवल्यानंतर त्यांचा राग माझ्यावर काढला जात आहे. तसचे कोणतंही आंदोलन अहिंसक पद्धतीने व्हावं अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
‘हाच देवेंद्र तुमच्या सत्तेचा बाबरी ढाचा पाडल्याशिवाय राहणार नाही’; फडणवीसांचे थेट आव्हान
दरम्यान, आज दिवसभर पुण्यात राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि काॅंग्रेसने स्मृती इराणी यांच्या विरोधात आंदोलन केलं. तर सोलापूरात देखील केतकी चितळेला समर्थन दिल्याप्रकरणी सदाभाऊ खोत यांच्याविरोधात राष्ट्रवादी काॅंग्रेसने जोरदार आंदोलन करीत घोषणाबाजी दिली. तर पुण्यात देखील भाजप आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आले. यावेळी मोदी हाय हाय च्या घोषणा राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून देण्यात आल्या.
Read also:
- “शिवसंपर्क अभियान नव्हतं तर शिव्या संपर्क भाषण होतं”
- “यांना रावणांची देखील उपमा देऊ शकत नाही”, नारायण राणेंची मुख्यमंत्र्यांवर बोचरी टिका
- ”गेल्या अडीच वर्षात NCP कडून काँग्रेसला संपवण्याचा प्रयत्न”; राष्ट्रवादीवर गंभीर आरोप करत नाना पटोलेंची थेट हायकमांडकडे तक्रार
- “आहो तुमचे नेतेच बहिरे झाले आहेत आधी त्यांना पहा”, चंद्रकांत खैरे यांचा फडणवीसांवर पलटवार
- आरोग्यमंत्र्यांनी दाखवली संवेदनशीलता; अपघातग्रस्तच्या मदतीला आले धावून; व्हिडीओ व्हायरल