औरंगाबाद : राज्यात सध्या रस्यावरील अपघातांच्या संख्यात वाढ झाली आहे. मागील काही दिवसात विधान परिषदचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर त्यानंतर राज ठाकरे यांच्या सभेसाठी जात असताना झालेले अपघात काळजी वाढवणारे आहेत. असाच एक औरंगाबाद जिल्ह्यातील देवगाव रंगारी या दरम्यान अपघात झाला. यावेळी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेही त्याच मार्गावरून जात असताना त्यांनी स्वत: अपघात ग्रस्त व्यक्तीला रूग्णावाहिकेमध्ये बसवून रूग्णालयात पाठवले.
जवळपास 50 वकिलांनी घेतली राज ठाकरेंची भेट ! मशिदीवरील भोंगा प्रकरण
राजेश टोपे हे औरंबाद येथील देवगाव रंगारी येथून जालन्याकडे जात असताना प्रवासादरम्यान त्यांना रस्त्यात एक अपघातग्रस्त दुचाकीस्वार दिसला. त्यांनी आपल्या ताफ्यातील ड्राव्हरला तात्काळ गाडी थांबवण्यास सांगितली. त्यानंतर त्या व्यक्तीला स्वत: राजेश टोपे यांनी आपल्याच ताफ्यातील गाडीत बसवले. त्यानंतर त्याला जवळील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी पाठवले.
दुसऱ्यांच्या वजनाबद्दल, व्यंगाबद्दल बोलता, मग कोणी म्याव म्याव आवाज काढला, तर वाईट का वाटलं?
त्यानंतर आरोग्यमंत्र्यांनी त्या व्यक्तीला पुढील उपचारासाठी ॲम्ब्युलन्सद्वारे औरंगाबाद येथे पाठवून योग्यरीत्या उपचार करण्याबाबत कळवले. नागरिकांनी प्रवास करत असताना रस्त्यात अपघात झालेला दिसल्यास अपघातग्रस्त व्यक्तींना मदत करून शासकीय यंत्रणांना सूचित करावे, असे आवाहन वारंवार केले जाते. आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे यांनी सदर मदत करून जनतेसमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
केतकी चितळेला शिवीगाळ, चोपायची भाषा करणाऱ्यांवर कारवाई करणार का? चित्रा वाघ यांचा सवाल
दरम्यान, राष्ट्रवादी काॅंग्रेसने या संदर्भात एक व्हिडीओ ट्विट केला आहे. त्या व्हिडीओमध्ये स्वत: अपघातग्रस्त व्यक्तीला उचलताना दिसत आहेत. त्या अपघातात त्या व्यक्तीला जबरदस्त मार लागला असून रस्त्यावर रक्ताचा सडा पडला आहे. त्यामुळे हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून राजेश टोपे यांनी समाजासमोर एक नवा आदर्श घालवून दिला आहे.
राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री ना. @rajeshtope11 हे औरंगाबाद जिल्ह्यातील देवगाव रंगारी येथून जालन्याकडे जात असताना प्रवासादरम्यान त्यांना रस्त्यात एक अपघातग्रस्त दुचाकीस्वार दिसला. आरोग्यमंत्र्यांनी तात्काळ गाडी थांबवून अपघातग्रस्त व्यक्तीला मदत केली. #accidenthelp pic.twitter.com/ZdP57pWZJh
— NCP (@NCPspeaks) May 16, 2022
Read also:
- “जो बायकोचा होऊ शकला नाही तो महाराष्ट्राचा काय होणार”; उद्धव ठाकरेंवर सोमय्यांनी केली बोचरी टीका
- नेहमीप्रमाणे मुंबईला तुंबई म्हणून जागतिक स्तरावर बदनाम करणार का? नितेश राणेंचा तिखट सवाल
- ‘हाच देवेंद्र तुमच्या सत्तेचा बाबरी ढाचा पाडल्याशिवाय राहणार नाही’; फडणवीसांचे थेट आव्हान
- “उताराला लागलेली गाडी अन् वैफल्यग्रस्त विरोधी पक्ष नेत्याला ब्रेक लागणे कठीण”
- “वजनदार ने हल्के को, बस हल्के से ही वजन से, कल हल्का कर दिया”