पुणे : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह लिखाण केल्यामुळे मराठी अभिनेत्री केतकी चितळेला 18 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यादरम्यान, तिची पोलीस चौकशी होणार असून त्या तपासात नेमकी कोणती माहिती समोर येते, ते आता पहाणं महत्वाचं ठरणार आहे. तसेच केतकी चितळेला काल न्यायालयात देखील हजर करण्यात आलं होतं. आता याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राज्य सरकारला केतकी चितळेला सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला, अन् महाराष्ट्रवर आक्रमक होताहेत; राऊतांनी भाजपला सुनावलं
शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी केतकी चितळेला मोठ्या प्रमाणात टिकेचा सामाना करावा लागला. काल पोलीस ठाण्यातून बाहेर पडताच तिच्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अंडे आणि शाईफेक केली. तसेच तिला त्यावेळी मारहाण केली असल्याची खुद्द राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे. तसेच तिला सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं. यामुळे चित्रा वाघ यांनी यांच्यावर देखील कारवाई करण्याची मागणी केली आहे.
अखेर केतकी चितळेला पोलिसांनी घेतलं ताब्यात; जितेंद्र आव्हाडांनी मानले पोलिसांचे आभार
चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे की, केतकी चितळेवर कारवाई झाली. आता त्याचबरोबर केतकी चितळेला अतिशय अश्लाघ्य भाषेत शिवीगाळ, उघड उघड चोपायची, जीवे मारण्याची भाषा करणाऱ्या मर्दांवर आणि रणरागिणींवर देखील रितसर गुन्हे दाखल करून तात्काळ करावाई करावी, कायदा सर्वांना समान असतो, असंही चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. सोबत त्यांनी काही सोशल मीडियावरील स्क्रिनशॉट देखील जोडले आहेत.
त्यांच्यासोबत मतभेद जरूर आहेत, मात्र अशा घाणेरड्या पातळीवर येणं साफ चुक, यांचा छडा लावा; राज ठाकरे
दरम्यान, केतकी चितळेनी न्यायालयात कोणताही वकिल घेतला नाही. तिने स्वत: याप्रकरणी युक्तिवाद केला. मी कोणतीही राजकीय व्यक्ती नाही. मला समाज माध्यमांवर माझे वैयक्तिक मत मांडण्याचा अधिकार नाही का? असा सवाल देखील केतकीने उपस्थित केला. तसेच ती पोस्ट माझी नाही. ती मी फक्त सोशल मीडियावरून कॉपी पेस्ट केली होती. सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करणं गन्हा आहे का? असाही सवाल तिने केला.
केतकी चितळे वर कारवाई झाली
आता
त्याच बरोबर केतकी चितळेला अतिशय अश्लाघ्य भाषेत शिवीगाळ..उघड उघड चोपायची/ जीवे मारण्याची भाषा करणाऱ्या मर्दांवर आणि रणरागिणींवर देखील रितसर गुन्हे दाखल करून तात्काळ कारवाई करावी.कायदा सर्वांना समान असतो,असं म्हणतात.@DGPMaharashtra @MahaCyber1 pic.twitter.com/HJV2QGvtSq
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) May 15, 2022
Read also:
- मग औरंगजेबच्या कबरीपर्यंत पोहचता यावं यासाठी का बुलेट ट्रेन? भाजप- शिवसेनेत ‘बुलेट ट्रेन वार’
- “कोदंडाचा जोरदार टणत्कार, काळ्या टोपीवाल्या मेंदुना झिणझिण्या नक्कीच आल्या असतील”
- “रश्मी ठाकरे तुंरुगात जाणार”; नवनीत राणांचं सुचक वक्तव्य, राजकीय वर्तुळात चर्चा
- सोशल मीडियावर भावना व्यक्त करणं गुन्हा आहे का? केतकी चितळेचा न्यायालयाला सवाल
- “तो स्वासचं फोटो आल्यानंतर दिल्लीतून पत्र आलं”; उद्धव ठाकरेंनी काढला सोमय्यांचा चिमटा