ठाणे : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी मराठी अभिनेत्री केतकी चितळेला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. काल तिने शरद पवार यांच्यावर फेसबुक पोस्ट केली होती. त्यामुळे तिच्यावर मुंबई, ठाण्यात आणि त्यानंतर पुण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. तसेच तिच्यावर कारवाई करण्याची मागणी जोर लावून धरली होती. अशातच पोलिसांनी तिला अटक केली आहे.
“हिंमत असेल तर अकबरुद्दीन ओवैसींचे दात तोडून दाखवा”; नवनीत राणांचे ठाकरे सरकारला पुन्हा आव्हान
केतकी चितळेंनी या अगोदर देखील असे वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. त्यामुळे तिच्यावर आतापर्यंत ठाणे, पुणे आणि सातारा अशा तीन ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी केतकी चितळे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी तिला ठाण्यातून ताब्यात घेतलं आहे. केतकी चितळे विरोधात पोलिसांनी केलेल्या कारवाई बद्दल राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मुंबई पोलिसांचे आभार मानले आहेत.
केतकी चितळेंनी केलेली पोस्ट अत्यंत खालच्या दर्जाची असून तिच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आता जोर धरू लागली होती. . समाजात तेढ निर्माण करण्याचे कृत तसेच दोन राजकीय पक्षांमध्ये द्वेषाची भावना निर्माण होईल अशा पद्धतीची पोस्ट केल्याने तिच्यावर कलम 505(2), 500, 501,153 ए नुसार कळवा पोलीस ठाण्यात गन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज विरोधकांना करारा जवाब देणार का?
दरम्यान, राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या नेत्या रूपाली पाटील यांनी देखील केतकी चितळ्याचा समाचार घेतला आहे. चि चि चवताळीस बाई तू महिला असली तरी छपरीच तु, संस्कार नसलेली केतकी, इतकीशी कशी चवताळीस हरामखोर विकृती, मनोरुग्ण तुला चपलेने 100 मारून 1 मोजले पाहीजे. कशात ना मशात केतकीबाई तमाशात , लवकरच जंगी चोपाची गरज आहे हिला ,मिळणारच बाई तुला चोप. असं रूपाली पाटील यांनी म्हटलं आहे.
Read also:
- त्यांच्यासोबत मतभेद जरूर आहेत, मात्र अशा घाणेरड्या पातळीवर येणं साफ चुक, यांचा छडा लावा; राज ठाकरे
- “नवनीत राणा या आधी बारमध्ये काम करत होत्या”
- “आजची सभा हि शंभर सभेंचा बाप, विरोधकांच्या पोटदुखीवर आजच्या सभेत उपचार होतील”
- कार्यकर्ता हा वेडा असतो, तुम्ही आमच्या बापावर लिहाल तर..; जितेंद्र आव्हाडांचा कडक इशारा
- “अंगावर भगवी वस्त्रे अन् हातात हनुमानाची मुर्ती घेतली म्हणजे तु हिंदूची नेता नाही”