मुंबई – राज्यात गेल्या काही दिवसांपासून मशिदींवरील भोंगे, हनुमान चालीसा आणि हिंदुत्व यावर राजकीय वाद चालू आहेत. या मुद्द्यांवर आज खुद्ध शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्याचन्हे लक्ष लागले आहे. आज मुंबईतील बीकेसी मैदानात शिवसेना प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेपूर्वीच शिवसेना नेते संजय राऊत यांनी या सभेचे तोंडभरून कौतुक केले आहे.
‘हिंदूजननायक शिवसेना प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे’; शिवाजीराव आढळराव पाटलांनी दिली नवी उपाधी
मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आजच्या सभेत विरोधकांच्या पोटदुखीवर योग्य उपचार होतील, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला. अर्थात हे राज्य, हा पक्ष हा पूर्णपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानेच आणि बाळासाहेब ठाकरेंच्या प्रेरणेने चाललेला आहे. काही लोक हे राज्य बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेक प्रश्न निर्माण केलेत, काही अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. ही जी पोटदुखी आहे, ही जी काही लोकांची जळजळ आहे. त्यावर मला असं वाटतं आजच्या सभेने योग्य उपचार केले जातील, असे म्हणत संजय राऊत यांनी विरोधकांवर टीका केली.
संजय राऊत पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातील, देशातील राजकीय वातावरण आणि या वातावरणावर आलेला एक मळभ, धुकं, गढूळपणा हे आजच्या सभेने खासकरून उद्धव ठाकरे यांच्या भाषणाने पूर्णपणे दूर होईल आणि महाराष्ट्राचे आकाश निरभ्र होईल. फक्त इथे भगव्या रंगाचाच धनुष्य या आकाशात तुम्हाला दिसेल. महाराष्ट्र अस्थिर करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना उद्धव ठाकरे करारा जबाव देतील.
मुंबै बॅंक बोगस निवडणुक प्रकरणात दरेकरांना अटक होण्याची शक्यता? मुंबई पोलीस दाखवणार खाक्या
शिवसेना आणि गर्दी यांचे एक नाते आहे. आम्हाला गर्दी जमवावी लागत नाही. लोक आपोआप जमतात. आजची सभा ही क्रांतीकारी सभा असेल, आतापर्यंत झालेल्या शंभर सभांचा बाप अशी ही आजची सभा असणार आहे. या सभेतून सर्व प्रश्नांची उत्तर मिळतील, असेही संजय राऊत यांनी म्हटले. तसेच बाळासाहेब ठाकरे हेच हिंदुहृदयसम्राट होते आणि यासंदर्भात प्रश्नच उपस्थित होऊ शकत नाही, असेही ते म्हणाले.
Read also:
- शरद पवारांवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी तरूणाला अटक; तरूणांचा मोबाईलही जप्त
- कार्यकर्ता हा वेडा असतो, तुम्ही आमच्या बापावर लिहाल तर..; जितेंद्र आव्हाडांचा कडक इशारा
- “अंगावर भगवी वस्त्रे अन् हातात हनुमानाची मुर्ती घेतली म्हणजे तु हिंदूची नेता नाही”
- “हिंमत असेल तर अकबरुद्दीन ओवैसींचे दात तोडून दाखवा”; नवनीत राणांचे ठाकरे सरकारला पुन्हा आव्हान
- टोमणे सभेत मुख्यमंत्री, राष्ट्रवादी अन् काॅंग्रेसची बंधनं झुगारून बाळासाहेबांचं स्वप्न पुर्ण करणार का?