नाशिक : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल सोशल मीडियावर केलेल्या वक्तव्यावरून एका तरूणाला महागात पडलं आहे. त्या तरूणाचा शोध घेऊन दिंडोरी ग्रामिण पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याचा मोबाईल देखील जप्त करण्यात आला आहे. याबद्दल राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
“विश्वातघात तर नाना पटोलेंनी केला”; नाना पटोलेंच्या आरोपांवर राष्ट्रवादीकडून खंडन
वेळ आली आहे बारामतीच्या गांधीसाठी..बारामतीचा नथुराम गोडसे करण्याची, काका माफी माग अशी आक्षेपार्ह टिप्पणी सटाणा येथील निखिल भामरे या तरूणांनी केली होती. 11 मे रोजी सांयकाळी त्यांनी याबाबत ट्विट केलं होतं. काय पातळी वर हे सगळे होते आहे. ह्या विकृत इसमाविरूद्ध कारवाई करा, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं होतं. त्यानंतर त्या तरूणांचा पोलिसांनी शोध घेत त्याला दिंडोरीतून ताब्यात घेतलं आहे.
केतकीबाईला लवकरच जंगी चोपाची गरज; रूपाली पाटलांचा केतकीला इशारा
निखिल भामरे हा मुळचा सटाणा येथील असून तो दिंडोरीत शिक्षणासाठी आला. जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानंतर लगेचच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. निखिल भामरे या तरूणास दिंडोरीतून पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे. त्याच्या मोबाईलमध्ये आक्षेपार्ह मजकूर देखील मिळाला आहे. निखिल हा मूळचा सटाणामधील असून तो शिक्षणासाठी दिंडोरीत होता. याप्रकऱणी आणखी तपास केला जात आहे. निखिल यास रविवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. असं नाशिक ग्रामीणचे पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांनी सांगितलं आहे.
केतकी चितळेचं डोकं फिरलं..! पवारांना उद्देशून म्हणाली की, “ऐँशी झाले आता उरक, वाट पहातो नरक”;
दरम्यान, तसेच मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिने देखील काल शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट केली आहे. त्यामुळे केतकी चितळेविरोधात पुण्यात तसेच ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. केतकी चितळेंनी शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे पुण्यात राष्ट्रवादी काॅंग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेर रूपाली पाटील यांनी देखील केतकी चितळेला कडक इशारा दिला आहे.
Read also:
- कार्यकर्ता हा वेडा असतो, तुम्ही आमच्या बापावर लिहाल तर..; जितेंद्र आव्हाडांचा कडक इशारा
- “अंगावर भगवी वस्त्रे अन् हातात हनुमानाची मुर्ती घेतली म्हणजे तु हिंदूची नेता नाही”
- “हिंमत असेल तर अकबरुद्दीन ओवैसींचे दात तोडून दाखवा”; नवनीत राणांचे ठाकरे सरकारला पुन्हा आव्हान
- टोमणे सभेत मुख्यमंत्री, राष्ट्रवादी अन् काॅंग्रेसची बंधनं झुगारून बाळासाहेबांचं स्वप्न पुर्ण करणार का?
- हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज विरोधकांना करारा जवाब देणार का?