मुंबई : मराठी अभिनेत्री केतकी चितळेंनी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल काल आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. त्यामुळे सगळ्या स्तरातून तिच्यावर जोरदार टिका टिप्पणी केली जात आहे. शरद पवार यांच्याबद्दल वक्तव्य केल्याप्रकरणी तिच्यावर कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा देखील नोंद करण्यात आला आहे. अशातच आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केतकी चितळेंवर निशाणा साधला आहे.
केतकीबाईला लवकरच जंगी चोपाची गरज; रूपाली पाटलांचा केतकीला इशारा
केतकी चितळेंनी ज्या पद्धतीने टीका केली आहे. ती त्यांच्या मानातील विकृती आहे याबाबत महाराष्ट्र भर सर्व स्तरावरून टिका होत आहे. आमच्या भगिनी ने जे काही लिहिले आहे. ते अत्यंत घाणेरडे पनाचे आहे. शरद पवार हे मनाने खुप मोठे आहे. पूर्वीचा जितेंद्र आव्हाड असतो तर मी वेगळे प्रकारे रिएॅक्ट केलं असते. याबद्दल मर्यादा पाळतो, मात्र कार्यकर्ते मर्यादा पाळणार नाही. असाही इशारा दिला आहे.
केतकी चितळेचं डोकं फिरलं..! पवारांना उद्देशून म्हणाली की, “ऐँशी झाले आता उरक, वाट पहातो नरक”;
कोणीही खालच्या पातळीवर टीका करणार आणि कार्यकर्त्याचे मस्तक भडकल्यावर नंतर काय दे मला माहिती नाही. त्यामुळे कोणाला पाय लावून देणार नाही. आणि पाय लावला तर सहन करू देणार नाही. कार्यकर्ता हा वेडा असतो त्यांचे बापाप्रमाणे पवार साहेबांवरती प्रेम आहे. इतक्या खालच्या पातळीवर जाऊन तुम्ही आमच्या बापाबाबत लिहू शकत नाही. आम्ही देखील राजकीय टिकेवर प्रत्युत्तर देणार, असंही त्यांनी म्हटलं आहे
“नानांना अजून सवय नाही का? काकांच्या खंजीरांनी वंसतदादा, राजीव गांधी, सोनियाजी घायळ झालेत”.
दरम्यान, केतकी चितळेंनी केलेली पोस्ट अत्यंत खालच्या दर्जाची असून तिच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. समाजात तेढ निर्माण करण्याचे कृत तसेच दोन राजकीय पक्षांमध्ये द्वेषाची भावना निर्माण होईल अशा पद्धतीची पोस्ट केल्याने तिच्यावर कलम 505(2), 500, 501,153 ए नुसार कळवा पोलीस ठाण्यात गन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read also:
- “अंगावर भगवी वस्त्रे अन् हातात हनुमानाची मुर्ती घेतली म्हणजे तु हिंदूची नेता नाही”
- “हिंमत असेल तर अकबरुद्दीन ओवैसींचे दात तोडून दाखवा”; नवनीत राणांचे ठाकरे सरकारला पुन्हा आव्हान
- टोमणे सभेत मुख्यमंत्री, राष्ट्रवादी अन् काॅंग्रेसची बंधनं झुगारून बाळासाहेबांचं स्वप्न पुर्ण करणार का?
- हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज विरोधकांना करारा जवाब देणार का?
- “विश्वातघात तर नाना पटोलेंनी केला”; नाना पटोलेंच्या आरोपांवर राष्ट्रवादीकडून खंडन