मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज बीकेसी मध्ये शिवसेनेची सभा होत आहे. या सभेतून विरोधकांना करारा जवाब मिळणार असा इशाराही खासदार संजय राऊतांनी दिला आहे. तर अमरावतीच्या खासदार नवनीत राणांनी मुख्यमंत्र्यांच्या सभेवेळी महाआरती करण्याचे आयोजन केले आहे. तसेच नवनीत राणा यांच्या हातात हनुमानाची मुर्ती असलेला फोटो काल सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावरून शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी राणांवर निशाणा साधला आहे.
केतकी चितळेचं डोकं फिरलं..! पवारांना उद्देशून म्हणाली की, “ऐँशी झाले आता उरक, वाट पहातो नरक”;
नवनीत राणा यांनी काल अंगावर भगवी शाल आणि हातात हनुमानाची मुर्ती असलेला फोटो काल सोशल मीडियावर पोस्ट केला. आज होणाऱ्या महाआरतीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा फोटो पोस्ट केला असल्याचं म्हटलं जात आहे. त्यावर अंगावर भगवे वस्त्र चढवले, हातात हनुमान मूर्ती घेतली म्हणजे तू हिंदूंची नेता झाली हा गैरसमज काढ बाई. ठाकरेंना हिंदुत्व शिकवण्याची हिम्मत करू नको. अन्यथा तू म्हणते तशी यापुढे १४ दिवस नाही तर १४ वर्षे.. असा इशारा देखील मनिषा कायंदे यांनी दिला आहे.
“नानांना अजून सवय नाही का? काकांच्या खंजीरांनी वंसतदादा, राजीव गांधी, सोनियाजी घायळ झालेत”
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज टोमणे सभा होत आहे. वाघनखं, मर्द, मावळा, कावळा यांचा उल्लेख ते निश्चितच करणार आहे. मात्र त्याव्यतिरिक्त त्यांनी आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न पुर्ण करावे. मशिदीवरील भोंगे आणि रस्त्यावरील नमाज अशी घोषणा बंद करूच अशी घोषणा आज करूनच टाका आणि या राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि काॅंग्रेसची बंधनं झूकारून टाका. असं मनसे नेते गजानन काळे यांनी म्हटलं आहे.
“औरंगजेबाला याच मातीत गाडलं होतं, जे भक्त आहेत त्यांना..;” राऊतांचा अकबरूद्दीन ओवेसीला इशारा
दरम्यान, गेल्या काही दिवसापासुन राज्यात हिंदुत्वाचा मुद्दा जोर धरू लागला आहे. त्यातच मशिदीवरील भोंगे आणि हनुमान चालिसा हे विषय पुढे येत आहेत. त्यावरून राज्यातील राजकीय नेत्यांना चांगलीचं खडाजंगी बघायला मिळाली आहे. मुख्यमंत्री झाल्यापासून उद्धव ठाकरे यांची मोठी राजकीय सभाच झाली नाही. गुढीपाडव्याला होणारी सभा देखील कोरोनामुळे पार पडली नाही. त्यामुळे या सभेत उद्धव ठाकरे या विषयांवरून विरोधकांना खडेबोल सुनावणार का ? ते आता पहाणं महत्वाचं ठरणार आहे.
Read also:
- “हिंमत असेल तर अकबरुद्दीन ओवैसींचे दात तोडून दाखवा”; नवनीत राणांचे ठाकरे सरकारला पुन्हा आव्हान
- टोमणे सभेत मुख्यमंत्री, राष्ट्रवादी अन् काॅंग्रेसची बंधनं झुगारून बाळासाहेबांचं स्वप्न पुर्ण करणार का?
- हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज विरोधकांना करारा जवाब देणार का?
- “विश्वातघात तर नाना पटोलेंनी केला”; नाना पटोलेंच्या आरोपांवर राष्ट्रवादीकडून खंडन
- केतकीबाईला लवकरच जंगी चोपाची गरज; रूपाली पाटलांचा केतकीला इशारा