औरंगाबाद : राज्यात काल एमआयएम आणि शिवसेना यांच्यात जोरदार खडाजंगी बघायला मिळाली. एमआयएमचे तेलंगणातील आमदार अकबरूद्दीन ओवैसी यांनी काल औरंगाबाद येथील दौरा केला. त्यावेळी त्यांनी एका महिला शाळेचं उद्घाटन केलं. मात्र खुल्ताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीचं त्यांनी दर्शन घेतलं. त्यावेळी औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील आणि वारिस पठाण देखील उपस्थित होते. त्यामुळे राज्यात यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. यावर आता शिवसेना खासदार संजय राऊतांनी संताप व्यक्त केला आहे.
राष्ट्रवादीत इनकमिंगचा धडाका; विविध पक्षातील नेत्यांनी बांधले घड्याळ
संभाजीनगरला वारंवार येऊन औरंगजेबाच्या कबरीपुढे गुडघे टेकत महाराष्ट्रात अशांतता निर्णाण करण्याचं काम ओवेसी बंधू राजकारण करताना दिसत आहे. परंतु मी त्यांना इतकंच सांगू इच्छितो की, औरंगाजेबाची कबर महाराष्ट्राच्या मातीत मराठ्यांनी बांधली आहे. त्याला कबरीत आम्ही टाकलं. तुम्ही कबरीवर येऊन नमाज पठण करत आहात. कधीही तुम्हालाही त्याच कबरीच जावं लागले. असा दम राऊतांनी दिला आहे.
‘राज ठाकरे असुरक्षित? राज ठाकरेंना तात्काळ संरक्षण द्या’; मिलिंद एकबोटे यांची मागणी
औरंगजेब काय महान संत नव्हता. त्याने महाराष्ट्रावर आक्रमण करत मंदिरं उद्धवस्त केली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि नंतर मराठा योद्ध्यांनी त्याच्यासोबत लढाई केली. परंतु महाराष्ट्रात येऊन त्याच औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेणं हे आव्हान दिल्यासारखं आहे. आम्ही हे आव्हान स्वीकारतो. औरंगजेबाला आम्ही याच मातीत गाडलं होतं आणि औरंगजेबाचे जे भक्त आहेत जे राजकारण करू इच्छित आहेत. त्यांचीही हीच स्थिती होईल, असा इशारा देखील राऊतांनी दिला आहे.
“संजय राऊत चिरकूट माणूस… त्यांना मुंगीही धमकी देणार नाही…”; मनसेने केली टिंगल
दरम्यान, अकबरूद्दीन औवेसी यांनी काल औरंगाबादच्या सभेत जाहीर भाषण केलं. त्यात त्यांनी असं म्हटलं की, तुम्हाला किंवा महाराष्ट्राच्या कोणत्याही मुस्लिमास अकबर औवेसी कधी विसरणार नाही. मग तो औरंगाबादचा माझा मुस्लीम बांधव असेल किंवा मग मुंबई, जालना, बीड, उस्मानाबाद, नांदेडचा माझा मुस्लीम बांधव असेल. प्रत्येक तरूण, वृद्धासह माझ्या माता-भगिनींनी ज्यांनी आम्हाला साथ दिली. त्यांना कधी औवेसी कधीच विसरला नव्हता. विसरलेला नाही आणि विसरणारही नाही. तसेच ज्यांना घरातून हाकलून लावलं त्यांच्याविषयी काय बोलायाचं असं म्हणत त्यांनी राज ठाकरे यांच्यावर देखील टिका केली.
Read also:
- “नानांना अजून सवय नाही का? काकांच्या खंजीरांनी वंसतदादा, राजीव गांधी, सोनियाजी घायळ झालेत”
- फक्त पोलिसांना 10 मिनिटे बाजूला करा…याला औरंगजेबाकडे..; नितेश राणेंचा ओवेसीला सज्जड दम
- “भाजप तुम्हाला हिंदुत्व शिकवणारे सावरकर नास्तिक होते बंर”..! राष्ट्रवादी-भाजपच्या ट्विटर वारमध्ये काॅंग्रेसची उडी
- ‘सरकार टिकवायचं असेल तर आमचंही ऐका’; महाविकास आघाडीतील धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर
- “संजय राऊतांमध्ये कादर खान घुसलाय, हा रोजचा तमाशा बंद करा”