मुंबई – मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि नेते बाळा नांदगावकर यांना मिळालेल्या ठार मारण्याच्या धमकीची शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी हेटाळणी केली. “धमकीची अशी शेकडो पत्र शिवसेना भवनात रोज येत असतात. महाराष्ट्रात कुणाच्या केसालाही धक्का लागणार नाही. त्यामुळे स्टंटबाजी सोडा आणि लोकांच्या प्रश्नांवर बोला.” असा खोचक सल्ला दिला.
राज ठाकरे यांना मुस्लिम संघटनांकडून धमक्या; मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांची भेट घेणार
यावर, संजय राऊत चिल्लर व्यक्ती आहे, असे सूचित करताना मनसेचे प्रवक्ते योगेश चिले यांनी राऊत यांची टिंगल करणारे ट्विट केले “संजय राऊत चिरकूट माणूस… त्यांना मुंगीही धमकी देणार नाही… कोणी धमकी द्यावी एवढेही त्यांचे कर्तृत्व नाही…,
‘शरद पवार भाजपला घाबरतात, एकट्याने लढण्याची त्यांच्यात हिंमत नाही’
दरम्यान, मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांच्या कार्यालयात धमकीचे एक पत्र आले. यात बाळा नांदगावकर आणि राज ठाकरे यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यासंदर्भात, बाळा नांदगावकर यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेऊन संबंधित पत्र त्यांच्या सुपूर्द केले होते. “मशिदीवरील भोंग्यांच्या प्रश्नावरून तुम्ही सुरू केलेले आंदोलन थांबवा, नाहीतर तुम्हाला जीवानिशी मारू आणि तुमच्या राज ठाकरेंनाही सोडणार नाही.” अशी धमकी पत्रातून देण्यात आल्याची माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली.
“राजद्रोहाच्या कलमाचा फेरविचार झाला पाहिजे, नाहीतर रद्द करायला हवा”; जितेंद्र आव्हांडाची प्रतिक्रिया
संजय राऊत हा "चिरकूट" माणुस… त्यांना मुंगीही धमकी देणार नाही… कोणी धमकी दयावी एवढही त्यांच कर्तृत्व नाही… @rautsanjay61 @SandeepDadarMNS @ShivSena @mnsadhikrut @TV9Marathi @abpmajhatv @JaiMaharashtraN @news_lokshahi @zee24taasnews
— Yogesh J Chile (@chileyog) May 12, 2022
Read also:
- अॅलेक्साला स्वीच ऑफ करता येईल, पण रोहित पवारांना नाही
- संभाजी राजे राज्यसभेची निवडणुक अपक्ष म्हणून लढविणार; ‘या’ संघटनेची केली मोठी घोषणा
- “टोमणे सभेला अटी-शर्ती आहेत का?”, मनसेचा शिवसेनेला पुन्हा टोमणा
- “हेडलाईन मिळवण्यासाठी नाना पटोलेंचं वक्तव्य”; नाना पटोलेंच्या वक्तव्याला अजित पवारांचं प्रत्युत्तर
- शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचं निधन; दुबईवरून पार्थिव आणण्याचे प्रयत्न सुरू