पुणे : छत्रपती संभाजी राजे यांच्याविषयी सध्या राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे. त्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपला असल्याने ते महाविकास आघाडीत जाणार की, विरोधी पक्षात याची उत्सुकता लागली होती. त्यांनी यासंदर्भात पुण्यात मोठी घोषणा केली आहे. तसेच जुलै महिन्यात होणारी राज्यसभेची निवडणुक ते अपक्ष म्हणून लढणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी आपल्या संघटनेची घोषणा देखील केली आहे.
जे कुटुंब प्रेमळ तिथं भांड्याला भांड लागतंच; नाना पाटोलेंच्या आरोपावर सुप्रिया सुळेंची सारवासारव
आतापर्यंतत समाजाच्या हितासाठी लढलो आहे. परंतु गेल्या काही वर्षापासून मला खासदारकी मिळाली. त्यामध्ये अनेक कामं करता आली. समाजासाठी कामे करायची असेल तर सत्ता महत्वाची आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत होणारी खासदारीकीची निवडणुक लढण्याचा निर्णय़ घेतला आहे. पंरतु ही निवडणुक अपक्ष म्हणून लढवणार आहे. असं ते म्हणाले. आजपासून मी कुठल्याही पक्षाचा सदस्य नाही. सगळ्यांना संघटित करण्यासाठी जिथे अन्याय होतो तिथे लढा देण्यासाठी मी आहे. आम्ही एक संघटना स्थापित करणार आहोत. त्याचं नाव स्वराज्य आहे. असंही त्यांनी जाहीर केलं आहे.
तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्यात संभाजी राजेंना प्रवेश नाकारला, अन्..;
राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आल्यानंतर बोलून विनंती केली की, राष्ट्रपती नियुक्त खासदार व्हावं. मी ते पद स्विकारलं. राष्ट्रपती महोदय, पंतप्रधान मोदी, देवेंद्र फडणवीस यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. त्यावेळी मी त्यांना शाहू महाराजाचं पुस्तक दिलं होतं. शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांच्या विचारावर चालणार आहे. त्या पुस्तकावर मी लिहिलं होतं. असंही ते म्हणाले.
भाजप नेते गणेश नाईक म्हणाले, हे प्रकरण संपल्यानंतर मी..; बलात्कार प्रकरण त्यांना भोवलं
दरम्यान, गेल्या काही दिवसामध्ये संभाजी राजे यांनी देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली होती. त्यामुळे ते भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा होती. तसेच राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी देखील संभाजी राजे यांचं कौतुक केलं होतं. त्यामुळे संभाजी राजे कुणाची वाट धरणार त्यांची वाट सगळ्याच पाहत होते. अशातच संभाजी राजे यांनी स्वराज्य संघटनेचे घोषणा करताच आणि अपक्ष म्हणून निवडणुक लढविणार असल्याचं वक्तव्य करून सगळ्यांच धक्का दिला आहे.
Read also:
- “टोमणे सभेला अटी-शर्ती आहेत का?”, मनसेचा शिवसेनेला पुन्हा टोमणा
- “हेडलाईन मिळवण्यासाठी नाना पटोलेंचं वक्तव्य”; नाना पटोलेंच्या वक्तव्याला अजित पवारांचं प्रत्युत्तर
- शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचं निधन; दुबईवरून पार्थिव आणण्याचे प्रयत्न सुरू
- राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील वाद दिल्लीत जाणार! राष्ट्रवादी-भाजप संबंध उघडे पाडण्याचा पटोलेंचा इशारा
- ‘राष्ट्रवादीने सुरा खुपसला’ हा नाना पटोलेंचा आरोप चुकीचा – जयंत पाटील