उस्मानाबाद : छत्रपती संभाजीराजे भोसले यांना तुळजा भवानीच्या दर्शनासाठी गेले असता त्यांना गाभाऱ्यात जाण्यापासून रोखण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्याचे पडसाद काल राज्यभर उमटले. तर त्याचवेळी संभाजीराजे भोसले यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना फोन करून चांगलचं सुनावलं. या घटनेमुळे मराठी क्रांती ठोक मोर्चाेने संताप व्यक्त करत मंदिर व्यवस्थापकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
राणा दाम्पत्य मुंबई मनपा निवडणुकीत उतरणार; उद्धव ठाकरे CM झाल्यापासून राज्याची दुर्दशा
संभाजी राजे हे काल उस्मानाबाद येथील तुळजा भवानी देवीच्या दर्शनासाठी मंदिरात गेले होते. त्यावेळी तेथील कर्मचाऱ्यांनी त्यांना मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्यापासून रोखलं. त्याचवेळी संभाजी राजे यांनी प्रशाकीय अधिकाऱ्यांना फोन करत चांगलंच धारेवर घेतलं. त्यामुळे त्याठिकाणी वातावरण जरा चांगलंचं चिघळलं.
“राजद्रोहाच्या कलमाचा फेरविचार झाला पाहिजे, नाहीतर रद्द करायला हवा”; जितेंद्र आव्हांडाची प्रतिक्रिया
मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून यासंदर्भात एक व्हिडीओ जारी करण्यात आला आहे. त्यात संभाजी राजे मंदिरातून संतापलेल्या अवस्थेत बाहेर पडताना दिसत आहे. तसेच त्याचवेळी त्यांनी अधिकाऱ्यांना फोन करत खडेबोल सुनावले. त्यामुळे मंदिर संस्थान धार्मिक व्यवस्थापक नागेश शितोळे यांच्या निलंबनाची मागणी करण्यात आली आहे.
राज ठाकरे यांना मुस्लिम संघटनांकडून धमक्या; मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांची भेट घेणार
दरम्यान, संभाजी राजे यांना मंदिरात प्रवेश नाकारल्याने मराठा क्रांती ठोक मोर्चांन तुळजापुरच्या तहसिलदारांना पत्र पाठवलं आहे. संभाजी राजे यांनी तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी आले असता कुठलाही प्रोटोकॉल न पाळता दर्शन घेण्यासाठी सहजनसंपर्क अधिकारी नागेश शितोळे यांनी गाभाऱ्यात येण्यास परवानगी नाकारली, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज संभाजीराजे भोसले यांचा अवमान केल्याने छत्रपती प्रेमीचं मन दुखावलं आहे. असंही ठोक मोर्चानं म्हटलं आहे.
Read also:
- भाजप नेते गणेश नाईक म्हणाले, हे प्रकरण संपल्यानंतर मी..; बलात्कार प्रकरण त्यांना भोवलं
- ” केंद्र सरकारने वेळीच धडा घेतला नाही तर महागाईचा भस्मासूर उग्र रूप धारण करेल”
- “माणसं जमा करायला शिवसेनेला राज ठाकरेंचा आधार घ्यावा लागतो का?”; शिवसेनेच्या टिझरमध्ये राज यांच्या सभेतील दृश्य
- राजद्रोहाच्या कलमामुळे कुणाला त्रास होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे; छगन भुजबळ
- राज ठाकरेंच्या केसालाही धक्का लागला तर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल! मनसे आक्रमक