मुंबई – हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन भाजप आणि मनसेकडून शिवसेनेला डिवचण्यात येत असताना शिवसेनेकडून आता 14 मे रोजी जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. या सभेतून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भाजप आणि मनसेला चोख प्रत्युत्तर देणार आहेत. शिवसेनेच्या या सभेसाठी एक टिझर लॉन्च करण्यात आला आहे. या टिझरवरुन मनसेने शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.
फर्मान, अल्टिमेटम जाहीर करणारे राज ठाकरे, बृजभुषण यांना प्रत्युत्तर देणार का? राष्ट्रवादीचा सवाल
मनसेचे नेते गजानन काळे यांनी दावा केला आहे की, शिवसेनेने लॉन्च केलेल्या टिझरमध्ये जे फोटोज आणि दृश्य वापरली आहेत ते राज ठाकरे यांच्या सभेतील आहेत. गुढीपाडव्याच्या दिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कात एक जाहीर सभा घेतली होती. या सभेतील फोटो आणि दृश्य शिवसेनेने वापरली असल्याचा दावाही गजानन काळे यांनी केला आहे.
“तर देशात भाजप विरोधात चळवळी उभ्या कराव्या लागतील”; शरद पवारांनी दिला ‘हा’ इशारा
आपल्या ट्विटमध्ये गजानन काळे यांनी म्हटलं, “असली नकली म्हणाऱ्यानी स्वतःचे आत्मपरीक्षण करा..काहीतरी अस्सल तुमचे असुद्या. इतके ही नकली होऊ नका. सभा शिवसेनेची आणि व्हिडीओमध्ये गर्दी मनसेच्या सभेची..अजून माणसं जमा करायला राजसाहेबांचाच आधार घ्यावा लागतो का ..? लक्षात आल्यावर ट्विट डिलिट करण्याची नामुष्की..नकली हिंदुत्ववादी”
असली नकली म्हणाऱ्यानी स्वतः चे आत्मपरीक्षण करा..काहीतरी अस्सल तुमचे असुद्या.
इतके ही नकली होऊ नका.
सभा शिवसेनेची आणि व्हिडिओ मध्ये गर्दी मनसेच्या सभेची…अजून माणसं जमा करायला राजसाहेबांचाच आधार घ्यावा लागतो का ..? लक्षात आल्यावर ट्विट डिलिट करण्याची नामुष्की…नकली हिंदुत्ववादी pic.twitter.com/LVKtoq7e6t— Gajanan Kale (@GajananKaleMNS) May 11, 2022
गजानन काळे म्हणाले, “शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन शिवसेनेने 14 मे रोजीच्या सभेचा एक व्हिडीओ प्रसारित केला आहे. गंमत अशी की, या व्हिडीओत शिवाजी पार्कवर राज ठाकरे यांच्या सभेचे फोटो शिवसेनेने आपल्या व्हिडीओत वापरले आहेत. शिवसेनेला नेमकं झालंय काय? मनसेचे नगरसेवक चोरता चोरता शिवसेना आता स्वत:च्या सभेसाठी राज ठाकरेंच्या सभेचे फोटो चोरू लागली आहे. अहो.. चोरण्याची सुद्धा हद्द असते. शिवसेनेचा आत्मविश्वास गेला आहे का? शिवसेनेला नैराश्य आलं आहे का?असली नकलीच्या गप्पा मारता मारता आता तुमचं नकली हिंदुत्व उघड पडू लागलं आहे का? राज ठाकरेंच्या सभेचा आधार आणि मनसेच्या सभेचा आधार घेऊन शिवसेना गर्दी जमवू पाहत आहे. शिवसेनेचं नाव बदलून आता चोर सेना ठेवावं, नकली सेना ठेवावं असंही गजानन काळे म्हणाले.
Read also:
- देशद्रोहाच्या कायद्याला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, नवनीत राणांसह अनेक नेत्यांना दिलासा
- “सी ग्रेड कपल”ची पोलिसांनी दखल घ्यावी; किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल
- मस्तवाल झालेल्या या सरकारने राज्यात अक्षरश: हैदोस घातलाय; दरेकरांची राज्य सरकारवर खरमरीत टिका
- राजद्रोहाच्या कलमामुळे कुणाला त्रास होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे; छगन भुजबळ
- राज ठाकरेंच्या केसालाही धक्का लागला तर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल! मनसे आक्रमक