मुंबई : अंधेरी पुर्व मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचं काल ह्यदविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. 52 वर्षीय लटके यांनी दुबईत अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे महाराष्ट्राभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. आमदार रमेश लटके यांनी राज्यातील अनेक नेत्यांनी भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांचे पार्थिव दुबईवरून आणण्याचे सध्या प्रयत्न सुरू आहे.
” केंद्र सरकारने वेळीच धडा घेतला नाही तर महागाईचा भस्मासूर उग्र रूप धारण करेल”
बुधवारी रमेश लटके यांचे कुटुंबीय शॉपिंगसाठी बाहेर गेले असता. त्यांना अचानक ह्यदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांची प्राणज्योत मालवली. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी आम्ही सध्या आमदार रमेश लटके यांचं पार्थिव दुबईवरून आणण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती दिली आहे. लटके यांच्या निधनाच्या बातमीमुळे त्यांच्या समर्थकांना आणि शिवसैनिकांना मोठा धक्का बसला आहे.
“आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका”; भोंग्याबाबत राज ठाकरे पुन्हा आक्रमक, दिला ‘हा’ इशारा
भाजपचे उमेदवार सुनील यादव यांचा 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पराभव करत अंधेरी पुर्व मतदारसंघातून पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून गेले होते. त्यानंतर 2019 मध्ये त्यांनी अपक्ष उमेदवार असणाऱ्या एम पटेल यांना पराभूत केलं होतं. तसेच ते 1997 साली मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यानंतरच्या सन 2002 आणि 2009 च्या महापालिका निवडणुकीत देखील विजयी होत ते महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले.
“संदीप देशपांडे यांना पोलीस असे काही शोधत आहेत की, ते जणू पाकिस्तानातून आलेले अतिरेकी”; राज ठाकरे
दरम्यान, आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे शिवसेनेला मोठा फटका बसला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे दुख व्यक्त केलं आहे. तर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दुख व्यक्त करताना म्हणाले की, विधानसभेतील आमचे सहकारी, शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या अकाली निधनाचे वृत्त ऐकून धक्का बसला. नगरसेवक ते आमदार या प्रवासात मोठा परिवार त्यांनी जोडला. उमद्या मनाचा एक सच्चा कार्यकर्ता.
Read also:
- राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील वाद दिल्लीत जाणार! राष्ट्रवादी-भाजप संबंध उघडे पाडण्याचा पटोलेंचा इशारा
- ‘राष्ट्रवादीने सुरा खुपसला’ हा नाना पटोलेंचा आरोप चुकीचा – जयंत पाटील
- जे कुटुंब प्रेमळ तिथं भांड्याला भांड लागतंच; नाना पाटोलेंच्या आरोपावर सुप्रिया सुळेंची सारवासारव
- तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्यात संभाजी राजेंना प्रवेश नाकारला, अन्..;
- भाजप नेते गणेश नाईक म्हणाले, हे प्रकरण संपल्यानंतर मी..; बलात्कार प्रकरण त्यांना भोवलं