पुणे : भाजप नेते नितेश राणे यांचं शिवसेनेशी असलेलं वैर सगळ्यांना माहिती आहे. शिवसेनेवर नितेश राणे सातत्याने टिका करीत असतात. मात्र आता त्यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसवर टिका करण्यास सुरूवात केली आहे. त्यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यावर खोचक शब्दात टिप्पणी केली आहे.
शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचं निधन; दुबईवरून पार्थिव आणण्याचे प्रयत्न सुरू
नितेश राणे यांनी रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, अॅमेझॉनकडे अॅलेक्सा आहे. तर महाराष्ट्रात रोहित पवार आहे. मात्र यात थोडा फरक आहे. दोघांनाही सगळे माहीत आहे. फक्त अॅलेक्साला स्वीच ऑफ करता येते मात्र रोहित पवारांना नाही, असा चिमटा देखील त्यांनी काढला आहे. त्यावर आता रोहित पवार काय प्रत्युत्तर देणार ते पहावं लागणार आहे.
राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील वाद दिल्लीत जाणार! राष्ट्रवादी-भाजप संबंध उघडे पाडण्याचा पटोलेंचा इशारा
रोहित पवार सतत सोशल मीडियावरून राजकीय भूमिका मांडत असतात. कोणत्याही कार्यक्रमाला गेले की ते तेथील फोटो, व्हिडीओ शेअर करीत असतात. अलिकडेच त्यांनी उत्तर प्रदेशमधील दौऱ्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. त्यावर लोकांनी प्रचंड कमेंट्स केल्या होत्या.
राष्ट्रवादीने सुरा खुपसला’ हा नाना पटोलेंचा आरोप चुकीचा – जयंत पाटील
दरम्यान, राज ठाकरे यांनी शरद पवारांना नास्तिक म्हटले होते. त्यानंतर राज्यात फार मोठा वादगं निर्माण झाला होता. तसेच राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याआधी रोहित पवार अयोध्याला जाऊन आले तर शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे देखील अयोध्या दौऱ्यावर जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर नितेश राणे यांनी रोहित पवारांवर टिका केली आहे.
Read also:
- “कृपा करुन शेतकऱ्यांनी टोकाची भूमिका घेऊ नका”; अजित पवारांचं शेतकऱ्यांना आवाहन
- भाजपने आखली रणनीती; शिवसेनेला घेरण्यासाठी आता अमित शहा येणार !
- संभाजी राजे राज्यसभेची निवडणुक अपक्ष म्हणून लढविणार; ‘या’ संघटनेची केली मोठी घोषणा
- “टोमणे सभेला अटी-शर्ती आहेत का?”, मनसेचा शिवसेनेला पुन्हा टोमणा
- “हेडलाईन मिळवण्यासाठी नाना पटोलेंचं वक्तव्य”; नाना पटोलेंच्या वक्तव्याला अजित पवारांचं प्रत्युत्तर