अमरावती : अलिकडेच पार पडलेल्या भंडारा, गोंदिया जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या अध्यक्ष आणि सभापती पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने भाजपसोबत युती केली. त्यावर काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादीने काॅंग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप केला. त्यावर राष्ट्रवादीकडून देखील नाना पटोले यांना प्रत्युत्तर देण्यात आलं. अशातच आता राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसच्या या वादात भाजपने उडी घेतली असून काॅंग्रेसला भाजपने डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
‘राज ठाकरे असुरक्षित? राज ठाकरेंना तात्काळ संरक्षण द्या’; मिलिंद एकबोटे यांची मागणी
नाना अजून सवय नाही झाली काय खंजीर खूपसून घ्यायची? स्वर्गीय वसंतदादा पाटील, स्वर्गीय राजीव गांधी, आणि सोनियाजी घायाळ झालेले आहेत. काकाच्या खंजीरांनी. गोड मानून घ्या सत्तेच्या तुकड्यासाठी. अशा शेलक्या शब्दात भाजपनेते डॉ. अनिल बोंडे यांनी नाना पटोले यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. आहे. तसेच महाविकास आघाडीचा लिखीत करार मोडून राष्ट्रवादीने भाजपसोबत जाऊन सत्ता स्थापन केली, ही दगाबाजीच आहे. याला पाठीत खंजीर खुपसणे नाही तर दुसरे काय म्हणायचे ? असा सवाल नाना पटोले यांना राष्ट्रवादीला केला आहे.
“संजय राऊत चिरकूट माणूस… त्यांना मुंगीही धमकी देणार नाही…”; मनसेने केली टिंगल
त्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशध्याक्ष जयंत पाटील यांनी नाना पटोले यांना प्रत्युत्तर दिलं आहे. आघाडीला डिस्टर्ब करण्याचा राष्ट्रवादीने कधीही प्रयत्न केला नाही किंवा एकला चलो ची भूमिकाही घेतलेली नाही. तिन्ही पक्ष एकत्र रहावेत हीच राष्ट्रवादीची आधीपासूनची भूमिका आहे. प्रफुल पटेल हे परदेशात असल्याने त्यांच्याशी संपर्क झाला नाही. कोणत्या परिस्थितीत गोंदिया जिल्हापरिषदेबाबत निर्णय़ झाला हे तपासल्यानंतरच बोलणे योग्य होईल असं त्यांनी म्हटलं आहे.
“कृपा करुन शेतकऱ्यांनी टोकाची भूमिका घेऊ नका”; अजित पवारांचं शेतकऱ्यांना आवाहन
दरम्यान, नाना पटोले यांनी राष्ट्रवादीवर केलेला आरोप आरोप चुकीचा आहे. राज्यात येणार्या काळात अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. स्थानिक नेतृत्वाने सर्वांना एकत्रित चर्चा करून महाविकास आघाडी एकत्र रहावी, असे प्रयत्न करणे अपेक्षित होते. गोंदियामध्ये नाना पटोले म्हणतात त्याप्रमाणे काही वेगळे प्रयोग झाले असेल तर त्याची नोंद पक्ष घेईल, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
Read also:
- फक्त पोलिसांना 10 मिनिटे बाजूला करा…याला औरंगजेबाकडे..; नितेश राणेंचा ओवेसीला सज्जड दम
- “भाजप तुम्हाला हिंदुत्व शिकवणारे सावरकर नास्तिक होते बंर”..! राष्ट्रवादी-भाजपच्या ट्विटर वारमध्ये काॅंग्रेसची उडी
- ‘सरकार टिकवायचं असेल तर आमचंही ऐका’; महाविकास आघाडीतील धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर
- “संजय राऊतांमध्ये कादर खान घुसलाय, हा रोजचा तमाशा बंद करा”
- राष्ट्रवादीत इनकमिंगचा धडाका; विविध पक्षातील नेत्यांनी बांधले घड्याळ