औरंगाबाद : राज्यात काल एमआयएम आणि शिवसेना यांच्यात जोरदार खडाजंगी बघायला मिळाली. एमआयएमचे तेलंगणातील आमदार अकबरूद्दीन ओवैसी यांनी काल औरंगाबाद येथील दौरा केला. त्यावेळी त्यांनी एका महिला शाळेचं उद्घाटन केलं. मात्र खुल्ताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीचं त्यांनी दर्शन घेतलं. त्यावेळी औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील आणि वारिस पठाण देखील उपस्थित होते. त्यामुळे राज्यात यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. यावर भाजपनेते नितेश राणे यांनी राज्य सरकार आणि अकबरूद्दीन ओवेसी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
“संजय राऊत चिरकूट माणूस… त्यांना मुंगीही धमकी देणार नाही…”; मनसेने केली टिंगल
मी आव्हान करतो. पोलिसांना 10 मिनिटे बाजूला करा… याला औरंगजेबाकडे नाही पाठवला तर… आम्ही शिवरायांचे मावळे नाही. असा सज्जड दम नितेश राणे यांनी आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांना दिला आहे. या कारट्या ओवैसीला माहित आहे की, मी औरंगजेबाच्या थडग्यासमोर नागडा नाचलो तरी मला दोन पायावर महाराष्ट्रात फिरता येईल. कारण राज्यामध्ये नामर्दांचे सरकार आहे. याला म्हणतात यांचे खरे हिंदुत्व, अशी टिका देखील नितेश राणेंनी केली आहे.
“कृपा करुन शेतकऱ्यांनी टोकाची भूमिका घेऊ नका”; अजित पवारांचं शेतकऱ्यांना आवाहन
मराठ्यांनी या औरंगजेबाची कबर बांधली. याच मराठी मातीत त्या औरंग्याची कबर आहे. तुम्हालाही या मातीत गाडायला आम्हाला वेळ लागणार नाही. तुम्ही फक्त मला दहा मिनिटांसाठी तेथील पोलीस बाजूला करा नाही आम्ही याला औरंजेबाकडे पाठवतो. असा कडक इशारा देखील त्यांनी दिला आहे.
भाजपने आखली रणनीती; शिवसेनेला घेरण्यासाठी आता अमित शहा येणार !
दरम्यान, अकबरूद्दीन औवेसी यांनी काल औरंगाबादच्या सभेत जाहीर भाषण केलं. त्यात त्यांनी असं म्हटलं की, तुम्हाला किंवा महाराष्ट्राच्या कोणत्याही मुस्लिमास अकबर औवेसी कधी विसरणार नाही. मग तो औरंगाबादचा माझा मुस्लीम बांधव असेल किंवा मग मुंबई, जालना, बीड, उस्मानाबाद, नांदेडचा माझा मुस्लीम बांधव असेल. प्रत्येक तरूण, वृद्धासह माझ्या माता-भगिनींनी ज्यांनी आम्हाला साथ दिली. त्यांना कधी औवेसी कधीच विसरला नव्हता. विसरलेला नाही आणि विसरणारही नाही. तसेच ज्यांना घरातून हाकलून लावलं त्यांच्याविषयी काय बोलायाचं असं म्हणत त्यांनी राज ठाकरे यांच्यावर देखील टिका केली.
Read also:
- “भाजप तुम्हाला हिंदुत्व शिकवणारे सावरकर नास्तिक होते बंर”..! राष्ट्रवादी-भाजपच्या ट्विटर वारमध्ये काॅंग्रेसची उडी
- ‘सरकार टिकवायचं असेल तर आमचंही ऐका’; महाविकास आघाडीतील धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर
- “संजय राऊतांमध्ये कादर खान घुसलाय, हा रोजचा तमाशा बंद करा”
- राष्ट्रवादीत इनकमिंगचा धडाका; विविध पक्षातील नेत्यांनी बांधले घड्याळ
- ‘राज ठाकरे असुरक्षित? राज ठाकरेंना तात्काळ संरक्षण द्या’; मिलिंद एकबोटे यांची मागणी