सांगली – महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्वकाही आलबेल आहे. महाविकास आघाडीचं सरकार कार्यकाळ पूर्ण करेल, असा दावा शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांकडून सातत्याने केला जातो. तर हे सरकार पडणार, हे सरकार पाच वर्षे टिकणार नाही, असं भाकित भाजप नेते करत असतात. अशावेळी आता पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारमधील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे.
भाजप नेते गणेश नाईक म्हणाले, हे प्रकरण संपल्यानंतर मी..; बलात्कार प्रकरण त्यांना भोवलं
कारण महाविकास आघाडीचं सरकार टिकवायचं असेल तर आमचंही ऐकून घेतलं पाहिजे. म्हणजे शिवसेनेचे नेते, कार्यकर्त्यांमध्ये खदखद राहणार नाही, अशा शब्दात खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना एकप्रकारे इशारा दिलाय. आम्ही काही मंत्रीपद मागायला आलो नाही. ना सत्ता मागायला आलोय. फक्त महाविकास आघाडीत आम्हाला त्रास होतोय, अशी खंत अनिल बाबर यांनी बोलून दाखवली आहे.
तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्यात संभाजी राजेंना प्रवेश नाकारला, अन्..;
शिवसेनेच्या वतीनं आज आटपाडीमध्ये सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तानाजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्याला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई, शिवसेना नेते नितीन बानगुडे पाटील, खासदार धैर्यशील माने, आमदार अनिल बाबर यांची प्रमुख उपस्थिती होती. शिवसेनेच्या मेळाव्याला मोठ्या संख्येनं शेतकरी वर्गही उपस्थित होता.
जे कुटुंब प्रेमळ तिथं भांड्याला भांड लागतंच; नाना पाटोलेंच्या आरोपावर सुप्रिया सुळेंची सारवासारव
यापूर्वी शिवसेना आमदारांनी निधीवाटपावरुन जाहीर नाराजी व्यक्त केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना जास्त निधी दिला जातो. तसंच त्यांच्या आमदारांचं काम लवकर होतात. मात्र, शिवसेना आमदारांची अवहेलना सुरु असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. इतकंच नाही तर त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेही तक्रार करण्यात आली होती.
Read also:
- “उद्धवा दिलेली स्क्रिप्ट व्यवस्थित पाठ कर”; उद्धव ठाकरेंच्या तोंडी शरद पवारांची भाषा; भाजपाचा टोला
- “संजय राऊतांमध्ये कादर खान घुसलाय, हा रोजचा तमाशा बंद करा”
- राज्यसभेच्या 6 खासदारांसाठी निवडणुक जाहीर; राऊत, गोयल, पटेल यांना मिळणार पुन्हा संधी?
- राष्ट्रवादीत इनकमिंगचा धडाका; विविध पक्षातील नेत्यांनी बांधले घड्याळ
- ‘राज ठाकरे असुरक्षित? राज ठाकरेंना तात्काळ संरक्षण द्या’; मिलिंद एकबोटे यांची मागणी