मुंबई : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना आज अटक होण्याची शक्यता आहे. मुंबै बॅंक मजूर प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र न्यायालयाच्या आदेशामुळे प्रवीण दरेकर यांची तात्काळ जामिनावर सुटका होण्याची शक्यता आहे. यासाठी प्रवीण दरेकर थोड्यात वेळात माता रमाबाई आंबेकर पोलीस ठाण्यात दाखल होणआर आहेत. अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे.
फक्त पोलिसांना 10 मिनिटे बाजूला करा…याला औरंगजेबाकडे..; नितेश राणेंचा ओवेसीला सज्जड दम
प्रवीण दरेकर यांनी मुंबै बॅंकेच्या निवडणुकीत मजूर वर्गातून निवडणुक लढविली होती. मात्र त्यावर आम आदमी पार्टीने आक्षेप नोंदवत त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले होते. सहकार विभागाने याची चौकशी करत प्रवीण दरेकर यांना या निवडणुकीत अपात्र ठरवत त्यांचं सदस्यत्व देखील रद्द केले.
त्यानंतर प्रवीण दरेकर यांनी या प्रकरणी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालायाने त्यांना 35 हजारांच्या जातमुचलक्यावर आणि दोन जामीनदारांची हमी देण्याचे हमी देत जामीन मंजूर केला होता. त्याचसंबंधी ते आता माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात बोलवण्यात आले आहे. त्याठिकाणी त्यांना अटक करून लगेच जामीन देणार असल्याची माहिती समोर येत आहे.
‘सरकार टिकवायचं असेल तर आमचंही ऐका’; महाविकास आघाडीतील धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर
दरम्यान, प्रवीण दरेकर यांनी मुंबै बॅंक निवडणुक ही बोगस मजूर म्हणून लढवली होती. त्यावरून त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता. गेल्या काही महिन्यांपासून प्रवीण दरेकर यांच्यावर अटक होण्याची घंटा वाजत होती. मात्र आज न्यायालयाने जामीन अर्ज मंजूर करून प्रवीण दरेकर यांना मोठा दिलासा मिळला आहे.
Read also:
- “तुम्हाला एवढीच हौस आहे, तर राजद्रोहाचा गुन्हा ओवैसींवर लावा”, ठाकरे सरकारला राम कदम यांचं खुलं आव्हान!
- राष्ट्रवादी -भाजप युतीच्या चर्चेला जोर; प्रफुल्ल पटेल यांच्या कार्यक्रमाला भाजपच्या मुख्यमंत्र्यांची हजेरी
- “हिरवा अन् भगव्याच्या वादामध्ये मला रंग नसलेला भोंगा हवाय”; अमोल कोल्हेंच्या ‘या’ दमदार भाषणाची चर्चा
- “औरंगजेबाला याच मातीत गाडलं होतं, जे भक्त आहेत त्यांना..;” राऊतांचा अकबरूद्दीन ओवेसीला इशारा
- “नानांना अजून सवय नाही का? काकांच्या खंजीरांनी वंसतदादा, राजीव गांधी, सोनियाजी घायळ झालेत”