पुणे : राज्यात सध्या मशिदीवरील भोंगा आणि हनुमान चालिसावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलाचं तापलं आहे. त्यावरून अनेक राजकीय नेत्यांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अशातच पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीच्या वतीने राष्ट्रीय एकात्मता स्नेह मेळावा, जश्ने-ईद-ए-मिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांसह अनेक राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते. त्यावेळी खासदार अमोल कोल्हे यांनी केलेल्या भाषणाची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे.
“संजय राऊतांमध्ये कादर खान घुसलाय, हा रोजचा तमाशा बंद करा”
अमोल कोल्हे त्या भाषणात म्हणाले की, इंद्रायणी मेटीसिटीची बैठक पार केल्यानंतर मला रस्त्यावर एक भोंग्याचं दुकान लागलं. त्या भोंग्यांच्या दुकानात मध्ये टांगलेला एक भगवा आणि एक हिरवा भोंगा होता. भगवा भोंगा त्याचा सराव करत होता. हिरवा भोंगा त्याचा सराव करत होता आणि एक रंग नसलेला भोंगा बाजूला अडगळीत पडला होता. दोन भोंग्यांचा वाद पेटलेल्या रंग नसलेल्या भोंग्याकडे बाकीच्या दोन भोंग्यांने त्याला विचारलं. तु काय शांत बसला आहे. ?
राष्ट्रवादीत इनकमिंगचा धडाका; विविध पक्षातील नेत्यांनी बांधले घड्याळ
त्यावर त्यांनी सांगितलं की, आता तुम्ही तावातावाने बोलाताहेत. वर्षाभरापुर्वी मी कोविड सेंटरच्या बाहेर होतो. मी रूग्णवाहिकेच्या बाहेर होतो आणि वर्षभरानंतर हे सगळ बदललंय. हिरवा आणि भगवा भोंगा म्हणाला की. अरे तुला आता मार्केट राहिलं नाही. तेवढ्यात एक शाळकरी मुलगा आला. त्या शाळकरी मुलाला विचारलं कुठला भोंगा हवाय? त्या शाळकरी मुलाना तिन्ही भोंग्याकडे पाहिलं. तिन्ही भोंग्याकडे बघून त्यांनी रंग नसलेल्या भोंग्याकडे बोट दाखवलं.
‘राज ठाकरे असुरक्षित? राज ठाकरेंना तात्काळ संरक्षण द्या’; मिलिंद एकबोटे यांची मागणी
दुकानदारानं विचारलं कशाला हवाय भोंगा ? तो म्हणाला, “वाढदिवसानिमित्त शाळेला भेट द्यायची आहे”. शाळेला भेट देताना या रंगाच्या भोंग्यातून हे ऐकायला येत असेल. त्या भोंग्यातून ते ऐकायला येत असेल. तर मला रंग नसलेला भोंगा हवा. ज्या मधून जनगन ऐकू येईल. अमोल कोल्हे यांनी केलेल्या भाषणाची क्लिप सध्या सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे.
एका शाळकरी मुलाने दुकानात जाऊन भगवा किंवा हिरवा भोंगा न घेता रंग नसलेला भोंगा घेतला, कारण ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!
सर्वधर्मीय ईद मिलन कार्यक्रम…#भोंगा pic.twitter.com/NAWcMEwCRr
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) May 13, 2022
Read also:
- “औरंगजेबाला याच मातीत गाडलं होतं, जे भक्त आहेत त्यांना..;” राऊतांचा अकबरूद्दीन ओवेसीला इशारा
- “नानांना अजून सवय नाही का? काकांच्या खंजीरांनी वंसतदादा, राजीव गांधी, सोनियाजी घायळ झालेत”
- फक्त पोलिसांना 10 मिनिटे बाजूला करा…याला औरंगजेबाकडे..; नितेश राणेंचा ओवेसीला सज्जड दम
- “भाजप तुम्हाला हिंदुत्व शिकवणारे सावरकर नास्तिक होते बंर”..! राष्ट्रवादी-भाजपच्या ट्विटर वारमध्ये काॅंग्रेसची उडी
- ‘सरकार टिकवायचं असेल तर आमचंही ऐका’; महाविकास आघाडीतील धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर